Download App

Ashok Chavan यांची ‘भगवी शाल’ सोशल मीडियावर व्हायरल!

नांदेड : माझ्या गळ्यात भगवी शाल म्हणजे शिवसेना (Shivsena) आहे. हातात घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) आहे आणि मी म्हणजे काँग्रेस (Congress) आहे, अशी फटकेबाजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली. महाविकास आघाडीच्या (MVA) कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे उपस्थितांमध्ये प्रचंड हशा पिकला.

नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडीची एकत्रित सभा आयोजित केली होती. त्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, बरेच लोकं म्हणत असतील की अशोक चव्हाण यांच्या गळ्यात भगवी शाल कशी काय, सर्वांच्या भुवया उंचावल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वांना सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र काम करत आहे. आजची सभा देखील महाविकास आघाडीतील तीन पक्षाची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी एकत्रित होत आहे. त्यामुळेच मी गळ्यात भगवी शाल (म्हणजे शिवसेना) घातली आहे. तर हातामध्ये घड्याळ (म्हणजे राष्ट्रवागी काँग्रेस) घातले आहे. आणि तुमच्यासमोर मी (काँग्रेस) उभा आहे, अशी तुफान टोलेबाजी केल्यामुळे उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला.

Onion Price : भाव नाही म्हणून कांद्याची होळी; रोहित पवार म्हणतात, “सरकार दौऱ्यावर, राज्य वाऱ्यावर”

राज्यात एकिकडे भाजप आणि शिंदे युती अधिक बळ प्राप्त होत असतानाच अशोक चव्हाण यांनी गळ्यात घातलेल्या भगव्या शालीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पण हा नेमका का घातलाय, याचं उत्तर चव्हाण यांनीच त्या व्हिडिओत दिले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीत जाण्याच्या चर्चा नेहमीच रंगत आहेत. अनेकदा काँग्रेसच्या कार्यक्रमांना अशोक चव्हाण गैरहजर असले की हे संशय अधिक वाढत जातात. मात्र, अशोक चव्हाण यांचा नांदेड येथील सभेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात त्यांनी गळ्यात चक्क भगवा शाल घातली आहे.

अशोक चव्हाण यांनी नांदेड येथील कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या गळ्यात हॉी भगवी शाल होती. भाषणादरम्यान, त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, ‘ तुम्ही विचार करत असाल, माझ्या गळ्यात भगवा शाल कशी.. तीच भगवी शाल उंचावत अशोक चव्हाण यांनी सांगितले की, ही महाविकास आघाडीच्या पक्षांची सभा आहे. शाल म्हणजे शिवसेना आहे. हातात घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाकी म्हणजे काँग्रेस आहे.

अशोक चव्हाण यांनी घातलेल्या भगव्या शेल्याचा हा व्हिडिओ महाविकास आघाडी तसेच काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरूनच शेअर केला आहे. त्यामुळे या व्हिडिओचा गैर अर्थ कुणी घेणार नाही, याची खातरजमा करण्यात आली आहे. तसेच अशोक चव्हाण यांनीच याचे उत्तर देखील दिले आहे.

Tags

follow us