Nanded Death : नांदेडमधील येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं आहे. मागील 24 तासांत रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ उडाल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी तत्काळ दखल घेत रुग्णालयास भेट दिली. चौकशी झालीच पाहिजे. मात्र, याच रुग्णालयात 70 रुग्ण गंभीर अवस्थेत असून, राज्य सरकारने युद्धपातळीवर निर्णय घेऊन त्या रुग्णांचे प्राण वाचवावे,अशी मागणी अशोक चव्हाणांनी केली आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, रुग्णालयात एकूण 24 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 8 बालकांचा समावेश असल्याची माहिती आहे. काही प्रसूती झालेल्या महिलांचाही समावेश आहे. काही रुग्णांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला आहे. रुग्णालयाची परिस्थिती चिंताजनक असून अनेक नर्सेसच्या बदल्या झाल्या आहेत, डॉक्टरांची कमतरता असल्याने शासनाने इथल्या आरोग्य यंत्रणेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच रुग्णालयातील अजूनही 70 लोकांची प्रकृती चिंताजनक असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून रुग्ण उपचारार्थ दाखल झालेले आहेत. परिचारिकांच्या बदल्या झाल्यात, तांत्रिक मान्यता नाही, काही मशीन बंद पडल्यात त्याचे पैसे न दिल्याने बंद आहेत, अनेक अडचणी आहेत, रुग्णालय मेडिकल कॉलेज दुप्पटीच्या क्षमतेने काम करतंय, 500 क्षमता असताना 1200 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत.
Asian Games 2023 : अदितीने रचला इतिहास! ‘गोल्फ’मध्ये पदक जिंकणारी पहिलीच भारतीय
रुग्णायात रुग्णांची संख्या जास्त असल्याने स्टाफ कमी पडतो, निधी कमी पडतो, त्यामुळे तातडीने शासनाने मदत करावी, ही बाब गंभीर असून जिल्हा रुग्णालयाच्या स्टाफची मदत करण्याची गरज आहे, यासंदर्भात उद्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी करणार असल्याचंही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, ही दुर्देवी घटना असून उद्या नांदेडमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांकडून त्यांची समिती मंगळवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला भेट देणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.