मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजा मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी पक्ष सदसत्वाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चव्हाण यांनी मी दिनांक १२/०२/२०२४ मध्यान्हानंतर माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याव्दारे सादर करीत असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चांनी जोर धरला असून, चव्हाणांसोबत काँग्रेसमधील अन्य नेते आणि आमदाराही त्यांना साथ देणार असून त्यांची नावे आता समोर आली आहेत. या सर्वांनी त्याचे राजीनामे तयार ठेवले असल्याचेही सांगितले जात आहे. (Congress 10 More Leaders May Be Leave Party)
चव्हाणही दावा ठोकून हात चिन्ह मिळवणार?; राऊतांनी काढला वेगळाच अँगल
चव्हाणांसोबत कोण कोण?
काँग्रेस पक्षाच्या सदसत्वाचा आणि आमदारकीच्या राजीनाम्यात चव्हाणांसोबत असणाऱ्या काही काही नेत्यांची नावे समोर आली आहे. यात मुंबईतील दोन नावे असून, अमीन पटेल, अस्लम शेख, सुलभा खोडके, विश्वजीत कदम, माधव जवळकर, जितेश अंतापूरकर, अमित झनक, अमर राजूरकर आणि हिरामण खोसकर हेदेखील चव्हाणांची साथ देत राजीनाम देणार असल्याचे सांगितले जात आहे. आता हे सर्वजण भाजपसोबत जाणार की अजितदादांसमोबत जाणार याचीही चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वरील नावांशिवाय माजी मंत्री डी.पी. सावंत आणि माजी खासदार खतगावर हेदेखील चव्हाणांसोबत असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपकडून चव्हाणांना कोणती ऑफर?
चव्हाणांच्या राजीनाम्याच्या चर्चांमध्येच भाजपकडून अशोक चव्हाणांना कदाचित राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते अशीदेखील चर्चा आहे. एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadanvis) आगे आगे देखो होता है क्या असे सूचक वक्तव्य केलं आहे. तर, दुसरीकडे मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजून चव्हाण भाजपमध्ये येणार असल्याचा प्रस्ताव माझ्यापर्यंत आलेला नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे चव्हाणांच्या भाजप प्रवेशाचं नेमकं गौडबंगाल काय? अशा चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.
Ashok Chavhan : अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाण्याची सतत चर्चा का होते?
अमित शाहंच्या उपस्थितीत करणार भाजपमध्ये प्रवेश
एकीकडे चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आता ते भाजपमध्ये आजच प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला छ. संभाजीनगर दौऱ्यावर येणार आहे. याचवेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण शाहंच्या उपस्थित भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.