Ashutosh Kale : कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न एकाच पंचवार्षिकमध्ये 5 नं.साठवण तलावाच्या माध्यमातून आ. आशुतोष काळे यांनी सोडविला आहे. त्यांनी एवढ्यावरच न थांबता भूमिगत गटारींसाठी व सिवेज ट्रीटमेंट प्लँटसाठी देखील 280 कोटी निधी मंजूर करून आणल्यामुळे महत्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे व शिर्डी-सोनेवाडी परिसरात होणारी एमआयडीसी देखील त्यांनी कोपरगाव (Kopargaon) शहरात आणल्यामुळे कोपरगावला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले असल्याचे गौरवद्गार राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे यांनी केले आहे.
विकासाच्या बाबतीत कोपरगाव शहराला जिल्ह्यात नंबर एकवर घेवून जाण्यासाठी आ.आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी कोपरगाव शहराच्या भूमिगत गटार व सिवेज ट्रीटमेंट प्लँटसाठी 280 कोटी रुपये निधी मंजूर करून आणल्याबद्दल कोपरगाव व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने आ.आशुतोष काळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला याप्रसंगी काका कोयटे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आ.आशुतोष काळे यानी कोपरगाव शहराचा विकास करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सोडविला आहे. ज्यावेळी विकास कामे होतात त्यावेळी नागरिकांना काही काळ अडचणी सोसाव्या लागतात परंतु सुधारणा होत असतांना या अडचणी निर्माण होणे साहजिक आहे त्यावर मात केली पाहिजे यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असून त्याबाबत नागरिकांना आवाहन करू.
कोपरगाव शहरालगत होणारी एमआयडीसी हा कोपरगावच्या दृष्टीने क्रांतिकारी निर्णय आहे. मागील अनेक वर्षापासून एमआयडीसी व्हावी हि मागणी राधाकृष्ण विखे पाटील व आ.आशुतोष काळे यांच्यामुळे पूर्ण झाली असून सावळीविहीर-सोनेवाडी पर्यंत आली आणि कोपरगाव शहरात देखील येणार आहे. त्यामुळे चोहोबाजूंनी कोपरगावचा विकास होणार आहे. दोन एमआयडीसी व मध्यभागी असलेला समृद्धी महामार्ग, तसेच कोपरगाव रेल्वेस्टेशन व तालुक्यातच असलेले शिर्डी विमानतळाच्या माध्यमातून या एमआयडीसीत उत्पादित झालेला माल देशात व परदेशात देखील निर्यात होवून कोपरगावला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले असल्याचे काका कोयटे यांनी यावेळी सांगितले.
सत्काराला उत्तर देतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, 2019 ला जनेतेने सेवा करण्याची संधी दिली त्या पूर्वी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी 5 नं.साठवण तलावाबरोबरच इतरही विकास कामे पूर्ण करीन असा दिलेला शब्द मी या पाच वर्षात पूर्ण केला आहे. 5 नं.साठवण तलाव पूर्ण होवून तीन दिवसाआड पाणी पुरवठा देखील सुरु आहे व लवकरच उर्वरित कामे पूर्ण करून दिवसाआड पाणी पुरवठा करायचा असून त्याच धर्तीवर एक ते चार 5 नं.साठवण तलावाचे काम पूर्ण करून नागरिकांना दररोज पाणी द्यायचे नियोजन नगरपरिषदेच्या माध्यमातून होण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.
कोपरगाव शहरात पोलीस स्टेशन इमारत व कर्मचारी वसाहत, उपजिल्हा रुग्णालय, न्यायालय, शासकीय इमारती आदी इमारतींची कामे प्रगतीपथावर असून रस्ते, शहर सुशोभिकरण कामे झाली आहेत. बस स्थानक व्यापारी संकुल काम प्रगतीपथावर असून बस डेपोचे काम लवकरच सुरु होणार आहे. नगरपरिषद कार्यालयासमोरील व बाजार तळावरील व्यापारी संकूलाचे काम सुरु होणार आहे. अशा विविध शहर विकासाच्या योजना पूर्ण केल्या असून भूमिगत गटारीसाठी 280 कोटी निधी मंजूर करून आणला आहे.
भूमिगत गटारीसाठी खोदल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे झालेले रस्ते पुन्हा खराब होणार आहे परंतु रस्ते खूपच खराब असल्यामुळे रस्त्यांची कामे करणे गरजेचे होते. हि निरंतर चालणारी प्रक्रिया असून पुन्हा रस्त्यांची कामे करू. भूमिगत गटारी करतांना डीपी रोडच्या प्रकल्पांचे काम मंजूर करून घेवू त्यासाठी साडे सहाशे कोटी निधीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भूमिगत गटारीनंतर उच्च दर्जाचा रस्ता सर्व नियोजन करून केला जाणार आहे. जेणेकरून कोणत्याही कामासाठी रस्ता फोडला जाणार नाही याची काळजी घेतली जाईल.
सावळीविहिर-सोनेवाडी शिवारात होणाऱ्या शिर्डी एम.आय.डी.सी. व डिफेन्स क्लस्टरचा भूमीपूजन प्रसंगी कोपरगाव शहरालगत असलेल्या डेअरी पोल्ट्री व वळूमाता प्रक्षेत्राची असलेली जागा व औद्योगिक वसाहत येथील जिल्हा उद्योग केंद्राच्या मालकीची 71.75 हेक्टर, डेअरी पोल्ट्री अँड ब्रिडिंग फार्मचे मालकीची 86.40 हेक्टर व अॅग्रीकल्चर कोपरगांव कॅटल ब्रिडिंग सेंटर फार्मचे मालकीची 15.19 हेक्टर अशी एकूण 173.34 हेक्टर (433 एकर) जागेवर एम.आय.डी.सी.उभारावी अशी मागणी केली असता विखे पाटलांनी विनामुल्य देण्याचे जाहीर केले व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जागा उपलब्ध झाल्यावर एमआयडीसी उभारणार असल्याचे सांगितले ही आपल्यासाठी आनंदाची बातमी असून त्यामुळे कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला आर्थिक झळाळी मिळणार आहे. त्यामुळे मतदार संघातील जनतेप्रमाणे कोपरगाव व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट्स असोसिएशनने देखील विकासाच्या मागे उभे रहावे भविष्यकाळात विकासासाठी यापेक्षा जास्त निधी आणू अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.
भारत सरकारचा मोठा निर्णय, 6 कॅनडा अधिकाऱ्यांची हकालपट्टी, ‘या’ दिवसापर्यंत देश सोडण्याचे आदेश
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुधीर कोयटे आदींसह व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट्स असोसिएशनचे पदाधिकारी तसेच कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी माजी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.