Download App

Asim Sarode: नीलम गोऱ्हेनी पक्षप्रवेशावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देणे बेकायदेशीर

  • Written By: Last Updated:

Asim Sarode On Neelam Gorhe : एकनाथ शिदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभं राहणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंचा हात धरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नीलम गोऱ्हे यांनी शिवेसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी पक्ष प्रवेशावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देणे बेकायदेशीर असल्याचं असीम सरोदे यांनी सांगितलं (Asim Sarode Neelam Gorhe Illegal to Cite Supreme Court Decision During Party Entry)

नीलम गोऱ्हे यांनी पक्षप्रवेश करताना पत्रक जारी करून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील शिवसेना ही अधिकृत असल्याचं सांगताना सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा दाखला दिला एका संविधानिक पदावर काम करत असताना नीलम गोऱ्हे यांनी अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देणे योग्य नाही

त्यामुळे बेकायदेशीर संदेश यामुळे जात आहे आणि ही प्रतिक्रिया संयुक्तिक नाही शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भात निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला असला तरी या संदर्भात याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

मोठी बातमी! राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विधानसभा अध्यक्षांना अपात्रते संदर्भात निर्णय घ्यायचा आहे. असे असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत अशा प्रकारची प्रतिक्रिया संयुक्तिक नाही.

Tags

follow us