Download App

एक भेट-चर्चा अनेक! राहुल नार्वेकर आणि CM शिंदेंची ‘वर्षा’वर बंद दाराआड खलबतं

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी काल (18 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची ‘वर्षा’ या शासकीय बंगल्यावर भेट घेतली. दोघांमध्येही जवळपास पाऊण तास बंद दाराआड बैठक झाली. सध्या या भेटीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. मात्र मतदारसंघातील कामासंदर्भात ही भेट असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. पण या बैठकीदरम्यान आमदार अपात्रतेबाबत चर्चा झाल्याचे समजते. (Assembly Speaker Rahul Narvekar met Chief Minister Eknath Shinde yesterday (October 18) at the government bungalow ‘Varsha’)

सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना खडे बोल सुनावले आहेत. न्यायालयाने नार्वेकर यांना ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी नवरात्रीच्या सुटीच्या काळात वेळापत्रकाबाबत विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता सुनावणीचे नवीन वेळापत्रक नार्वेकर यांना तयार करावे लागणार आहे.

पुन्हा राजकीय भूकंप! अजित पवार गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात; जयंत पाटलांचा दावा

हे वेळापत्रक न्यायालयात सादर झाल्यानंतर आमदार आपत्रतेबाबतचा निर्णयही लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्षांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. मात्र ही भेट मतदारसंघातील कामासंदर्भात असल्याचे सांगत नार्वेकर यांनी या चर्चांना पूर्णविराम देत मतदारसंघातील कामासंदर्भात ही भेट असल्याचे सांगितले.

लोकसभा निवडणूक : शरद पवारांचे चार उमेदवार ठरलेच

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबई मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यासाठी नार्वेकर यांनी मतदारसंघातील कामात लक्ष घालण्यासही सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा मतदारसंघातील कामासंदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतानाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

माध्यमांशी कमी बोला आणि वेळापत्रक तयार करा :

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी कमी बोलावं आणि काम लवकर करावं, असा सल्ला देत सर्वोच्च न्यायालयाने 30 ऑक्टोबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे नवीन वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय घेताना होत असलेला विलंब या प्रकरणावर सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. यावेळी न्यायालयाने हा सल्ला दिला.

Tags

follow us

वेब स्टोरीज