अशोक खरात प्रकरणात सीए ललित पोफळेला वाचवण्याचा प्रयत्न?

Prakash Pophale : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशी सुरु असून या प्रकरणात दररोज नवेनवे खुलासे होत असल्याने संपूर्ण राज्यात

Prakash Pophale

Prakash Pophale

Prakash Pophale : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशी सुरु असून या प्रकरणात दररोज नवेनवे खुलासे होत असल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणात पुण्यातील हाय प्रोफाइल सीए ललित पोफळे खरा मास्टर माईंड असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, सीए सलित पोफळे खरातच्या शिवनिका ट्रस्टचा ट्रस्टी होता.

पोफळे (Prakash Pophale) अनेक वर्षांपासुन खरातच्या संपर्कात होता. खरात प्रकरणात ललित पोफळे हा मास्टर माईंड असल्याची चर्चा आहे. खरातचे अर्थिक व्यवहार पोफळेच्याच माध्यमातुन झाल्याचा आरोप होतोय. पोफळेच्या कुटुंबाच्या अनेक कंपन्या आहेत. यातुन खरातचे अर्थिक व्यवहार झालेत का हे तपासणे आवश्यक आहे. खरातची (Ashok Kharat) प्रगती होत असताना इकडे पोफळेची ही प्रगती झाल्याचं दिसतंय. कोरेगाव पार्क मधील कोट्यावधी रुपये किमत असलेला हा ललित पोफळेचा बंगला त्याची साक्ष देतोय मात्र पोफळेवर संशयाची मुख्य सुई असताना देखील एसआयटीने पोफळेला चौकशीसाठी अद्याप बोलावलं नाही.

पोफळेची तक्रार घेऊन खरातच्या विरोधात आणखी एक गुन्हा ?

तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, पोफळेची तक्रार घेऊन खरातच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. यासाठी सोमवारी (30 मार्च) पोफळे नाशिकला गेला होता. नाशिकला त्याने खरातच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता पोफळेची चौकशी करण्याऐवजी त्याला फिर्यादी बनवुन वावचले जात आहे का असा सशंय निर्माण होतो आहे.

चाळीशीच्या आत मेनोपॉज धोक्याची घंटा? अहवालातून समोर आला धक्कादायक खुलासा-

कोरेगाव पार्क परिसरात आठ रो हाऊससेस

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात खरातचा सीए प्रकाश पोफळे याचे आठ रो हाऊससेस, 49 गुंठे जागेसह खरेदी केली. कागदोपत्री याची किंमत 19 कोटी 56 लाख रुपये दाखवण्यात आली आहे. मात्र कोरेगाव पार्क हा परिसर पुण्यातील सर्वात महागड्या भागांपैकी एक असून, लेन नंबर तीनमध्ये अनेक बड्या उद्योगपतींची बंगल्यांची मालमत्ता आहे. खरेदीची खरी किंमत शंभर कोटींपेक्षा अधिक असल्याचं सांगितलं जात आहे.

Exit mobile version