Atul Bhatkhalkar on Ambadas Danve for Aurangjeb Kabar : गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये क्रूरकर्मा मुघल बादशहा औरंगजेबा वरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेला आहे या मुद्द्यावरून वारंवार सत्ताधारी आणि विरोधक भेटताना दिसतात यामध्येच आज भाजपने ते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर टीका करत अंबादास दानवे यांना सवाल केला.
‘फक्त 2 पुरावे हवेत…’ खोक्याची थेट घटनास्थळी परेड, बीड पोलिसांनी माज उतरवला
भातखळकर म्हणाले की, मुद्दा हा आहे की, औरंगजेबाची कबर सजवण्याची आवश्यकता काय आहे? औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन या विरोधकांचे फुल उधळण्याची आवश्यकता काय ? यांना केवळ औरंगजेबाचा थडगं सजवून मुस्लिम तुष्टीकरण करण्याची गरज आहे. मी विरोधकांना एवढाच इशारा देईन छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लपवण्याचं पाप तुम्ही इतकी वर्ष केलं. आज हिंदू समाज जागृत झालेला आहे. यापुढे औरंगजेबाचा थडगं वाचवण्याचा जास्ती प्रयत्न केला. तर हिंदू समाज त्या औरंगजेबाच्या थडग्यात तुम्हाला पुरल्या शिवाय राहणार नाही. हे विरोधकांनी लक्षात ठेवा.
घरकुलधारकांसाठी आनंदाची बातमी! आता राज्य सरकार देणार पाच ब्रास मोफत वाळू, काय आहे नियम?
तर अंबादास दानवे यांच्यावर बोलताना भातखळकर म्हणाले की, अंबादास दानवे ला म्हणावं की तुझ्या महाविकास आघाडीचे लोक आजही औरंगाबादला छत्रपती संभाजी नगर म्हणत नाहीयेत त्याच्यावर बोला म्हणावं आणि मग तुम्ही आमच्या सारख्या अस्सल हिंदुत्ववादी लोकांना काही शिकवण्याचा प्रयत्न करु नका. ज्या प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर उद्धव ठाकरे गट महानगरपालिकेत युती करायची भाषा करतोय ते प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन पुन्हा उजळलेली आहेत. त्याच्यावर विषयी अंबादास दानवांनी अधिभाष्य करावं आणि मग भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षांवर बोलावं.
आव्हाडांच्या डोक्यामध्ये या गोष्टी कधी शिरणारच नाहीत कारण आव्हाडांनीच महाराष्ट्राला हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. अफजलखान त्याने आई भवानी तुळजा आईचा मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तो स्वराज्य विस्तारा करता आला होता. आव्हाड म्हणतात अफजलखान होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्यामुळे असा खोट्या इतिहास लोकांनी नाकारलेले आहे. अफजलखानाची आणि औरंगजेबाची कबर नष्ट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असा आक्रमक पवित्रा भातखळकर यांनी घेतला होता.