‘फक्त 2 पुरावे हवेत…’ खोक्याची थेट घटनास्थळी परेड, बीड पोलिसांनी माज उतरवला

‘फक्त 2 पुरावे हवेत…’ खोक्याची थेट घटनास्थळी परेड, बीड पोलिसांनी माज उतरवला

Police Reaches Shirur Kasar With Satish Bhosale Recreates Crime Scene : कराडनंतर बीडमध्ये (Beed Crime) खोक्याभाई चांगलाच हिट झालाय. प्राण्यांची शिकार आणि लोकांना अमानुष मारहाण या कारणांमुळे सतीश भोसले (Satish Bhosale) नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हरणांची शिकार आणि ढाकणे पितापुत्रांना मारहाण केल्यानंतर सतीश भोसले फरार होता. पोलिसांनी मागावर राहून त्याला प्रयागराज येथून अटक केली.

‘…मुंडेंनी खूप छळ केला, बाळा माफ कर’, फेसबुक पोस्ट लिहून शिक्षकाची आत्महत्या; बीड पुन्हा हादरलं

त्यानंतर आता पोलिसांनी खोक्याची परेड काढली असल्याचं समोर येतंय. मारहाण प्रकरणाचा व्हिडिओ (Crime News) झाला होता. त्यानंतर पोलीस सतीश भोसलेचा शोध घेत होते. अखेर अटक केल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याला त्याच ठिकाणी शिरुर कासार तालुक्यातील बावी गावात आणलं, जिथे खोक्याने ढाकणे पितापुत्रांना मारहाण केली होती. तिथे पोलिसांनी घटनेची संपूर्ण माहिती भोसलेकडून घेतल्याचं कळतंय. खोक्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सतीश भोसले हा भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं या प्रकरणात धसांचं देखील नाव जोडलं जातंय. तर दुसरीकडे सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. वन विभागानं सतीश भोसलेच्या घरावर कारवाई केली होती. कारण वन विभागाच्या जागेवरच अतिक्रमण करत त्याने घर उभारल्याचं समोर आलं होतं. बुलडोझर लावून तोडक कारवाई करत प्रशासनाने खोक्याचं घर जमीनदोस्त केलंय.

घरकुलधारकांसाठी आनंदाची बातमी! आता राज्य सरकार देणार पाच ब्रास मोफत वाळू, काय आहे नियम?

अटक केल्यानंतर सतीश भोसलेसह पोलिसांचं एक पथक आज बावी गावामध्ये पोहोचलं. तिथेच भोसलेने ढाकणे पितापुत्राला मारहाण केली होती. तिथेच पुन्हा पोलिसांनी आज क्राइम सीन रिक्रिएट केलाय. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केलाय. तर मारहाणीमध्ये वापरल्या गेलेल्या हत्यारांचा आणि वाहनांचा शोध पोलीस घेत आहेत. बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सध्या अलर्ट मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube