रोहित पवारांकडं राष्ट्रवादीतील त्या 40 लोकांची यादी, अतुल लोंढेंच्या दाव्याने खळबळ

सत्तेत गेल्यावर हे फुटणार आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार असल्याचा गौप्यस्फोट अतुल लोंढे यांनी केलाय.

News Photo 2026 05 18T164406.740 1

रोहित पवारांकडं राष्ट्रवादीतील त्या 40 लोकांची यादी, अतुल लोंढेंच्या दाव्याने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सध्या (NCP) सर्वकाही आलेबल नसल्याची जोरदार चर्चा आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे सरचिटणीस राहिलेल्या आनंद परांजपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर, दुसरीकडं राष्ट्रीय कार्यकारिणीवरुन प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे नाराज असल्याची देखील चर्चा सुरू आहे. त्यातच, पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटली. अशातचआता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही खो दिला आहे.

लोंढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकं कोण चालवत आहे. ⁠शरद पवार, भाजपा, सुनील तटकरे की प्रफुल पटेल? नेमक कोण चालवत आहे? तसंच, ⁠रोहित पवार यांच्याकडं राष्ट्रवादीतील 40 लोकांची नावं आहेत, जे भाजपमध्ये जाणार आहेत, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.

त्या विषयावर चर्चा करायची माझी इच्छा नाही, रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

रोहित पवार यांच्या मताशी मी सहमत आहे, जेपी ⁠नड्डा यांनी म्हणलं होतं विरोधी पक्ष राहणार नाही. त्यातच, ⁠सातत्याने अशा बातम्या येत आहे, सत्तेत गेल्यावर हे फुटणार आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार असल्याचा गौप्यस्फोट अतुल लोंढे यांनी केलाय. तसंच, शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेतील उपस्थितीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती किती वेळा आहे? असा सवाल त्यांनी विचारला.

त्याचबरोबर, त्यांची उपस्थिती अतिशय कमी आहे, ⁠ते टिंगल टवाळी करायला संसदेत येत आहेत. ⁠उध्दव ठाकरे यांची त्यांच्यापेक्षा जास्त आहे. पण, त्यांची उपस्थिती कमी होती हे खरं आहे, असेह लोंढे यांनी म्हटले. दरम्यान, आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करताना, सदाभाऊ स्वतः घुबड आहेत, अशा शब्दात अतुल लोंढेंनी सदाभाऊंवर टीका केली.

Exit mobile version