Download App

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात मतांच्या फुटीचा इम्तियाज जलील यांना फटका; अपक्षांची किती घेतली मत?

जलील हे सुरवातीच्या वीस फेऱ्यांपर्यंत आघाडीवर होते. मात्र, नवव्या फेरीत इम्तियाज यांची ५३ हजारांची आघाडी अकराव्या फेरीपासून कमी होत गेली.

  • Written By: Last Updated:

Atul Save Vs Imtiaz Jaleel :  औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे अतुल सावे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात अटीतटीचा सामना झाला. संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलं होते. (Imtiaz Jaleel) सुरवातीला एकगठ्ठा वाटणाऱ्या मुस्लिम मतांची शेवटच्या टप्प्यात फाटाफूट झाल्याने अवघ्या २,१६१ मतांनी सावे विजयी झाले आणि इम्तियाज जलील यांना पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे, पंधरा मुस्लिम उमेदवारांनी एकूण २३ हजार मते घेतली आहेत.

Election Result 2024 : महाराष्ट्राची कमान कोण सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढं?

जलील हे सुरवातीच्या वीस फेऱ्यांपर्यंत आघाडीवर होते. मात्र, नवव्या फेरीत इम्तियाज यांची ५३ हजारांची आघाडी अकराव्या फेरीपासून कमी होत गेली. या मतदारसंघात ६०.६३ टक्के मतदान झालं होतं. विद्यमान मंत्री अतुल सावे हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात एमआयएमचे माजी खासदार आणि एक वेळा आमदार राहिलेले इम्तियाज जलील यांनी त्यांना कडवी झुंज दिली. इम्तियाज जलील यांच्याविरोधात तब्बल १५ मुस्लिम उमेदवार उभे करण्यात आले होते. या सर्वांनी मिळून एकूण २३,९८६ मते घेतली. ही सर्व मते जलील यांची होती आणि या सर्व उमेदवारांना भाजपने उभे केले, अशी चर्चा आहे.

चार फेऱ्या उत्कंठाजनक

२१ व्या फेरीत अतुल सावे यांनी ३,३३६ मतांची आघाडी घेत इम्तियाज यांना मागे टाकलं. त्यानंतर पुन्हा २३ व्या फेरीत इम्तियाज यांनी सावेंना मागं टाकत २८९ मतांची आघाडी घेतली. मात्र, शेवटच्या २४ व्या फेरीत सावे यांनी इम्तियाज यांना मागं टाकत अवघ्या २,१६१ मतांनी विजय मिळवला. एकूणच ही लढत शेवटपर्यंत उत्कंठाजनक आणि कांटे की टक्कर अशीच झाली.

follow us