Video : मुख्य सूत्रधाराला वाचवलं जातंय? प्रदीप पूर्णेकर प्रकरणात अविनाश जाधवांचा गंभीर आरोप

Avinash Jadhav : ठाण्यातील ठाकरे गटाचे नेते प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणानंतर राज्य सरकारवर विरोधक चारही बाजूने जोरदार टीका करत आहे.

Avinash Jadhav

Avinash Jadhav

Avinash Jadhav : ठाण्यातील ठाकरे गटाचे नेते प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणानंतर राज्य सरकारवर विरोधक चारही बाजूने जोरदार टीका करत आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात काही आरोपींना देखील अटक केली आहे मात्र अद्याप मुख्य आरोपी कोण याबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याने  अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर आता या प्रकरणात लेट्सअप मराठीशी बोलताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. प्रदीप पुर्णेकर प्रकरणात शेवटचा पुरावा दुर्लक्षित केला जात असून सर्वांना सर्व माहिती असतानाही आरोपींना अटक होत नसून ठाण्यात जे चाललंय ते बीडपेक्षाही घाणेरडं आहे असं लेट्सअप मराठीशी बोलताना अविनाश जाधव म्हणाले.

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात (Pradeep Purnekar Case) पोलीस ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करत आहे. मला असं वाटत की ते लज्जास्पद आहे. ठाण्याला कलंक लागेल अशी गोष्ट सध्या सुरु आहे. जे काही ठाण्यात चाललंय ते बीडपेक्षा घाणेरडं आहे असंही अविनाश जाधव (Avinash Jadhav) म्हणाले.

बीड (Beed) जिल्ह्यात मागच्या दोन वर्षात 120 – 122 खून झाले आहेत आणि ठाण्यात मागच्या तीन वर्षात जवळजवळ 200 पेक्षा जास्त खून झालेत आणि मागच्या सात महिन्यात 92 च्या वरती अटेम्प्ट टू मर्डरचे गुन्हे दाखल असल्याचा दावा जाधव यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केला. तसेच ठाणे महाराष्ट्राच फायनान्शियल कॅपिटल आहे. मात्र या शहरात आता गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिक घाबरत आहे असं देखील अविनाश जाधव म्हणाले.

एकनाथ शिंदे, पोलीस खात्याच्या बदल्या तुमच्याशिवाय होत नाही

पुर्णेकर हत्या प्रकरणात अविनाश जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहे. एकनाथ शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांच्याकडे सर्वांची जबाबदारी आहे. पोलीस खात्याच्या बदल्या त्यांच्याशिवाय होत नाही. ठाण्यात आठ – दहा वर्षांपासून तेच तेच अधिकारी का? कारण ते तुमचं ऐकतात म्हणून तेच अधिकारी इथे राहतात असं यावेळी अविनाश जाधव म्हणाले.

अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव अन् भारतीय शेअर बाजारात तेजी ; सेन्सेक्स 1,500 अंकांनी उसळला

Exit mobile version