Download App

अयोध्या में शंखनाद, आ रहे हैं एकनाथ; मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याचा टीझर लॉन्च

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) 9 एप्रिलला अयोध्या (ayodhya)दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी शिवसेना शिंदे गटाकडून (Shivsena Shinde Group)मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याचा एक टीझर लॉन्च (Teaser launch)करण्यात आला आहे. त्या टीझरमध्ये अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ (Ayodhya mein Shankhanad, aa rahe hai Eknath)असा उल्लेख करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावरुन आल्यानंतर राज्यभरातून शिवधनुष्य यात्रा (Shiv Dhanushya Yatra)सुरु करणार आहेत.

चाहत्याच्या कमेंटला प्रशांत दामले यांचे प्रेमाने उत्तर; म्हणाले, ‘अशोक मामा मला अशी हाक मारतो…’

शिवसेनेनं लॉन्च केलेल्या टीजरमध्ये राज्यात सुशासन असावं आणि रामराज्यात शासक नाही तर सेवक असावा असं म्हटलं आहे. जनताच कुटूंब असावी आणि मानवाची सेवा हीच सर्वात महत्त्वाची असावी. जिथे अन्यायाच्या विरोधात आवाज उठेल आणि भगवा कधीच खाली येणार नाही. कणाकणात राम असावा अशी वाक्यही या टीझरमध्ये आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले समर्थक आमदार आणि खासदारांसह पदाधिकाऱ्यांना घेऊन येत्या 9 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अयोध्या दौऱ्यावरुन आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून राज्यभरात शिवधनुष्य यात्रा काढली जाणार आहे.

हा टीझर समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या टीझरमधील टॅगलाईन अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ ही सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यापूर्वीच अयोध्येमध्ये राममंदिर व्हावं ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर बांधून ते पूर्ण करत आहेत. यामध्ये खारीचा वाटा म्हणून सागाची लाकडं आम्ही पाठवली आहेत. त्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यासाठी चांदीची वीट पाठवली होती, त्यामुळे अयोध्या हा आमच्या श्रद्धेचा विषय असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं.

Tags

follow us