Badlapur Case : बदलापूरच्या एका नामांकित (Badlapur Case) शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण राज्यात आंदोलने देखील होत आहे. तर विरोधक देखील या घटनेनंतर राज्य सरकारवर जोरदार टीका करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात आता राज्य सरकार देखील ॲक्शन मोडवर आली असून सरकारने या प्रकरणात मोठी कारवाई करत शिक्षणाधिकारी यांचं निलंबन केलं आहे. यापूर्वी देखील सरकारने या प्रकरणात कारवाई करत गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. आता समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकचे (BMC) शिक्षण अधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ (Rajesh Kankal) यांचे निलंबन केले आहे.
महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही प्रकल्प अंमलबजावणी न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत सरकारने ही कारवाई केली आहे. याच बरोबर गृहविभागाने देखील या प्रकरणात मोठी कारवाई करत बदलापूरच्या पोलीस निरीक्षक शितोळे यांचे निलंबन करून त्यांची मुंबईला बदली केली आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात सखोल तपास करण्यात आलेल्या एसआयटीने POCSO च्या कलम 21 अंतर्गत शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शाळा व्यवस्थापनाने POCSO कायद्याच्या कलम 19 च्या तरतुदींचे पालन न केल्याने एसआयटीने (SIT) व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. POCSO कायद्याच्या कलम 19 नुसार, ज्या अधिकाऱ्याकडे अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचाराची माहिती येते त्यांना पुढील कारवाईसाठी पोलिसांना माहिती देणे आवश्यक असते मात्र शाळेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली नसल्याने POCSO च्या कलम 21 अंतर्गत शाळा व्यवस्थापनाविरुद्ध एसआयटीने गुन्हा दाखल केला आहे.
मोदी-योगींचे कौतुक पडले महागात, संतापलेल्या पतीने मारहाण करत दिला तिहेरी तलाक
महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद मागे
बदलापूरच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधा २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयाने कोणताही राजकीय पक्ष या पद्धतीने बंदाची हाक देऊ शकत नाही असा निर्णय दिल्याने महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.