Download App

Mumbai Local : मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, बदलापूर-खोपोली वाहतूक बंद

हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला

  • Written By: Last Updated:

Railway Block in Mumbai : मुंबईत उपनगरीय रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक असणार आहे. (Railway) मध्य रेल्वे मार्गावर दिनांक १०.०१.२०२५ आणि १२.०१.२०२५ (शुक्रवार आणि रविवार) रोजी दिवसा कर्जत स्थानकावर पोर्टल उतरवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक (दुसरा आणि तिसरा) असेल. मध्य रेल्वे कर्जत यार्ड सुधारणा संदर्भात कर्जत स्थानकावरील पोर्टल अनलोडिंगचे काम पूर्ण करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे. हे मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

दहा वर्षात देशाला काय-काय मिळालं? विमानतळ ते मेट्रो रेल्वेचा विस्तार , वाचा एका क्लिकवर

दुसरा ब्लॉक –

पुढीलप्रमाणे ब्लॉक असेल –

ब्लॉक दिनांक: १०.०१.२०२५ (शुक्रवार दिवस)

ब्लॉक कालावधी: ११.२० वाजता ते १३.०५ वाजता (०१ तास ४५ मिनिटे ब्लॉक)

वाहतूक ब्लॉक विभाग:

भिवपुरी रोड आणि पळसधारी स्थानकांदरम्यान अप, डाउन आणि मिड लाईन (क्रॉसओव्हर वगळून)

ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे संचालन:

ब्लॉक कालावधीत नेरळ ते खोपोली दरम्यानच्या उपनगरीय सेवा रद्द राहतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० ते ११.१४ दरम्यान कर्जतसाठी सुटणाऱ्या गाड्या नेरळ येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील.

कर्जत येथून सकाळी ११:१९ ते दुपारी १:०० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या गाड्या नेरळ येथून शॉर्ट ओरीजनेट करण्यात येतील.

11014 कोइम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कर्जत-पनवेल मार्गे वळवली जाईल आणि कल्याण येथे उतरू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी पनवेल येथे थांबेल.

तिसरा ब्लॉक –

ब्लॉक दिनांक: १२.०१.२०२५ (रविवार दिवस)

ब्लॉक कालावधी: १३.५० वाजता ते १५.३५ वाजता (०१ तास ४५ मिनिटे)

वाहतूक ब्लॉक विभाग –

पळसधरी आणि भिवपुरी रोड स्थानकांदरम्यान अप, डाउन आणि मिड लाईन (क्रॉसओव्हर वगळून)

मेगाब्लॉकच्या काळात गाड्यांचे वेळापत्रक कसे असणार?
बदलापूर आणि खोपोली स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.२० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – खोपोली आणि
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३.१९ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत उपनगरी गाडी अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट होईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३.४० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत उपनगरी गाडी बदलापूर येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.

कर्जत येथून १३.५५ वाजता सुटणारी कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन आणि खोपोली येथून १३.४८ वाजता सुटणारी खोपोली – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन अंबरनाथ येथून सुटेल. तसेच, कर्जत येथून १५.२६ वाजता सुटणारी कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन बदलापूर येथून सुटेल. ट्रेन क्रमांक 22194 ग्वाल्हेर – दौंड एक्सप्रेस दुपारी २:५० ते ३:३५ पर्यंत चौक येथे रेग्युलेट करण्यात येईल.

follow us