वेस्टर्न लाईनवर तब्बल 35 दिवसांचा मेगा ब्लॉक; गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईकरांचा खोळंबा होणार?

वेस्टर्न लाईनवर तब्बल 35 दिवसांचा मेगा ब्लॉक; गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईकरांचा खोळंबा होणार?

Western Line Mega Block : गणेशोत्सव तोंडावर असतानाच रेव्ले विभागाने मोठ काम हाती घेतलं आहे. (Mega Block) गोरेगाव आणि कांदिवली दरम्यानच्या सहाव्या रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी वेस्टर्न लाईनवर ऑगस्टच्या अखेरीस 35 दिवसांच्या मेगाब्लॉक सुरू होणार आहे. यामुळे तब्बल 650 ते 700 रेल्वे सेवा रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेच्या 202 गाड्या सोडणार, या तारखेपासून होणार बुकिंग सुरू

सहाव्या रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या या कामात 4.75 किमी लांबीच्या बांधकामाचा समावेश आहेत. दरम्यान गणेशोत्सव तोंडावर असताना हा निर्णय घेतल्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजी आहे. असं असले तरी 10 दिवसांच्या गणेशोत्सव उत्सवादरम्यान हे काम थांबवले जाईल असं अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याचं वृत्त आहे. मेगा ब्लॉक 27/28 ऑगस्टच्या रात्री सुरू होणार असून विस्तारीकरणाचं हे काम पाच आठवड्यांपर्यंत सुरू राहील.

Budget: रेल्वेला मिळणार बूस्टर डोस? हाय-स्पीड गाड्यांची संख्या वाढणार

केल होत जाहीर

काही दिवसांपूर्वीच रेल्वे विभागाकडटून काड्या सोडण्याचं आश्वासन दिलं होतं. गणेशोत्सवाला 7 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या 1 सप्टेंबरपासून सुरू होतील. त्यासाठी 21 जुलैपासून या गाड्यांच बुकिंग सुरू होईल अशी माहिती मुंबई मध्य रेल्वेचे CPRO स्वप्नील धनराज नीला यांनी दिली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube