Download App

मोठी बातमी : संविधानाचा आदर राखून उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे घ्या; शरद पवारांचे आवाहन

हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.

  • Written By: Last Updated:

मुंबई : उद्याच्या महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालायने नकार दिल्यानंतर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) उद्याचा बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. संविधानाचा आदर असून उद्याचा बंद मागे घ्या असे पवारांनी म्हटले आहे. पवारांच्या या आवाहनानंतर आता मविआतील नेते काशाप्रकारे दाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत पवारांनी एक्सवर एक ट्विट केले आहे. (withdraw Tomorrows Maharashtra bandh Sharad Pawar’s Appeal After Mumbai High Court Order)

मोठी बातमी : महाराष्ट्र बंदपूर्वी ‘मविआ’ला मुंबई HC चा दणका; बंद करणाऱ्यांविरोधात कारवाई करा

पवारांची पोस्ट काय? 

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन पवारांनी केले आहे.

 

बदलापूर् येथील शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर मविआकडून उद्या (दि.24) महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक देण्यात आली आहे. मात्र, या बंदपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने मविआला (MVA) दणका दिला आहे. कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत कोर्टाने बंद केला तर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत तातडीची सुनावणी पार पडली.

नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 14 जणांचा मृत्यू; हेल्पलाईन नंबर्स जारी; काय म्हणाले फडणवीस?

काँग्रस आणि ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

पवारांनी जर त्यांच्या पोस्टमध्ये उद्याचा महाराष्ट् बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नव्हता तर बदलापूर घटनेचा निषेध म्हणून होता. त्यामुळे सध्या तरी काँग्रेस उद्याच्या महाराष्ट्र बंदवर ठाम असून ठाकरे या सगळ्या संदर्भात थोड्यावेळात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी बंदला कोर्टाने नकार दिल्यानंतर आम्ही  कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करु, असे म्हटले आहे.

महाराष्ट्र नक्की हे काय घडतय? अनाथाश्रमातील तरुणींना वेश्याव्यवसायात ढकललं, साताऱ्यातील घटना

‘महाराष्ट्र बंद’ विकृती विरुद्ध संस्कृती – ठाकरे

उद्याचा महाराष्ट्र बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे. कुठल्या राजकीय नेत्यांच्या किंवा पक्षाच्या विरोधात नाही. तसंच या बंदवेळी अत्यावश्य सेवा कायम ठेवण्यासाठी आम्ही सहकार्य करणार आहोत. त्यामध्ये सर्व अत्यावश्यक सुरू राहतील. त्यामुळे कुणी या बंदला राजकीय समजू नये. (Uddhav Thackeray) उद्या 24 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. या बंदसाठी महाविकास आघाडी मैदानात उतरणार आहे. मात्र, आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी सर्व पालकांनी, भावांनी आणि आजोबांनी यामध्ये सहभागी व्हाव असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होते. ते दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

follow us