करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या, उद्या महाराष्ट्र बंदची घोषणा
Sukhdev Singh Gogamedi : राजस्थान नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर लगेच जयपूर येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi) यांच्या हत्या करण्यात आली आहे. या हत्येचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ करणी सेनेने (Karni Sena) महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. पंतप्रधान येत नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाहीत, असेही करणी सेनेने सांगितले आहे.
जयपूरमध्ये मंगळवारी हल्लेखोर सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या घरात घुसले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोगामेडी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेदरम्यान हल्लेखोरांनी सोबत असलेल्या एका व्यक्तीवर गोळी झाडली आणि घरात उपस्थित असलेला दुसरा व्यक्ती देखील गंभीर जखमी झाला.
आरोपींना पकडण्यासाठी नाकाबंदी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना पकडण्यासाठी कडक नाकाबंदी करण्यात आली असून रोहित गोदरा टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. राजस्थानचे पोलिस महासंचालक (डीजीपी) उमेश मिश्रा यांनी सांगितले की, हल्लेखोर गोगामेडी यांच्या घरात बोलण्याच्या बहाण्याने घुसले आणि काही वेळ बोलल्यानंतर त्यांनी गोळीबार सुरू केला.
त्यानुसार गोगामेडीच्या गार्डनेही प्रत्युत्तरात गोळीबार केला. मिश्रा म्हणाले की, नंतर दोन्ही हल्लेखोरांनी त्यांच्यासोबत असलेल्या नवीन शेखावत यांच्यावरही गोळ्या झाडल्या. त्यानुसार या घटनेत गोगामेडी आणि नवीन यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा ओळखीचा अजित गंभीर जखमी झाला.
डीजीपीच्या म्हणण्यानुसार, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस कडक नाकाबंदी करून संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकत आहेत. जनतेला संयम आणि शांतता राखण्याचे आवाहन करत त्यांनी पोलिसांना विशेष दक्षता घेण्याच्या आणि सुरक्षा वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी सांगितले की, “रोहित गोदरा टोळीने या घटनेची जबाबदारी घेतली आहे. हे लक्षात घेऊन बदमाशांच्या संपर्कात असलेल्या लोकांची ओळख पटवली जात असून लगतचे जिल्हे आणि बिकानेर विभागातही सातत्याने छापे टाकले जात आहेत.
20 सेकंदात रिकामं केलं मॅगजिन, राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची हत्या
त्यांनी सांगितले की, मी स्वतः शेजारील राज्य हरियाणाच्या पोलीस महासंचालकांशी बोलून त्यांचे सहकार्य मागितले आहे. गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलीस पथकाला लवकरच यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.