आमच्या कोणत्या शब्दाने कुणाचं हृदय दुखावलं असेल तर त्याचे आम्हाला मनापासून दुःख होत असून खेद वाटत असल्याचं म्हणत अखेर बागेश्वर धामचे प्रमुख बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) ऊर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माफी मागितली आहे. यासंदर्भातलं ट्विट बागेश्वर बाबांनी केलं आहे.
मेरा हमेशा संतों के प्रति महापुरुषों के प्रति सम्मान है और रहेगा मैंने कोई एक कहावत बोली जो हम अपने संदर्भ में बोल रहे थे कि अगर हम छतरी पीछे लगाकर कहें कि हम शंकराचार्य हैं तो ये कैसे हो सकता है…हमारे शंकराचार्य ने जो कहा वो हमने दोहराया कि साईं बाबा संत फ़क़ीर हो सकते हैं और… pic.twitter.com/aHWnC0Leal
— Bageshwar Dham Sarkar (Official) (@bageshwardham) April 5, 2023
काही दिवासांपूर्वीच एका कार्यक्रमात बागेश्वर बाबांनी शिर्डीच्या साईबाबांद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर देशभरातून बागेश्वर बांबावर टीक-टिप्पणी करण्यात येत होती. अशातच आता बागेश्वर बाबांनी माफी मागून वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
धक्कादायक ! महिलेवर बंदूक रोखत सराफा दुकानात दरोडा; चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
बागेश्वर बाबा म्हणाले, संत आणि महापुरुषांबद्दल मला नेहमीच आदर राहिला आहे. मी एक म्हण बोलली की आपल्या मागे छत्री ठेवून आपण शंकराचार्य आहोत असे म्हटले तर कसे होईल? आमच्या शंकराचार्यांनी जे म्हटलं त्याच गोष्टीचा आम्ही पुनरुच्चार केला होता.
करिअर विषयक साहित्य, अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना
साईबाबा संत, फकीर असू शकतात. त्यांच्याप्रमती लोकांची आस्था आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. कुणी संत किंवा गुरुंना देव मानत असेल तर ती त्याची वैयक्तिक आस्था आणि भावना आहे. आमचा त्याला अजिबात विरोध नाही. आमच्या कोणत्या शब्दाने कुणाचं हृदय दुखावलं असेल तर त्याचे आम्हाला मनापासून दुःख होत असून खेद वाटत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
अहमदनगरमध्ये दोन गटात प्रचंड राडा; अफवावर विश्वास ठेवू नका, पोलीसांचे अवाहन
याआधीही बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. तेव्हाही राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा साईबाबांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चर्चेत आले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर देशभरातल्या साईभक्तांनी, राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागली होती.
साईबाबा हे देव नसून फकीर असू शकतात असं बागेश्वर बाबांनी म्हंटलं होतं. तर त्याआधी संत तुकाराम महाराजांनी त्यांची पत्नी मारायची असं विधानही त्यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. आत्तापर्यंत बागेश्वर बाबांनी दोनदा महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी लागली आहे.