Vilas Ghule Murder Case: बीडच्या केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणावरून (Vilas Ghule Murder Case) राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी थेट राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवावा, अशी मागणीही सोनवणे यांनी केली आहे.
IND vs SL 1st Test: श्रीलंकेचा डाव 284 धावांत गडगडला; भारताला 178 धावांची आघाडी
विलास घुले यांची 20 जून रोजी केज तालुक्यात हत्या झाली होती. या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र तपासाच्या प्रक्रियेवर सोनवणे यांनी आक्षेप घेत पोलिसांवर काही दबाव आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे.
‘माझ्या मुलाचा संबंध आढळला तर मी स्वतः पोलिसांच्या हवाली करतो’
आपल्या मुलाच्या नावाची चर्चा या प्रकरणात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या CDR मध्ये आपल्या मुलाचा कुठेही संबंध आढळला, तर आपण स्वतः त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जाऊ, त्याला लपवण्याचा प्रश्नच नाही.
काशिमिरा पोलिसांची कारवाई; MCOC प्रकरणातील फरार आरोपीला २२ ऑगस्टपर्यंत ट्रान्झिट रिमांड
माझा मुलगा पळून गेलेला नाही किंवा लपून बसलेला नाही. त्यामुळे कोणताही संबंध नसताना त्याचं नाव या प्रकरणात घेण्याचा प्रयत्न करू नये, असंही सोनवणे यांनी म्हटलं.
‘सदानंद दातेंचा बीड पोलिसांवर विश्वास नाही का?’
विलास घुले हत्या प्रकरणाच्या तपासासाठी घेण्यात आलेल्या निर्णयावरही सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केला. बीड पोलिसांनी दोन दिवस तपास केल्यानंतर एसआयटीची स्थापना करण्यात आली आणि आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
दलित पँथर, भाजपशी युती अन् विद्यापीठ नामांतर; रामदास आठवले स्पष्टच बोलले
मात्र त्यानंतर पोलीस महासंचालकांकडे सकाळी अर्ज देण्यात आला आणि त्याच दिवशी संध्याकाळी CID तपासाचे आदेश कसे काय निघाले, असा सवाल त्यांनी केला. बीड पोलिसांची यंत्रणा तपास करत असताना अचानक तपासाची दिशा बदलण्याची गरज का पडली? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या निर्णयामागील कारण स्पष्ट करण्याची मागणी केली.
‘या प्रकरणात काहीतरी दबाव असल्याचा संशय’
विलास घुले प्रकरणात पोलिसांवर काहीतरी दबाव असल्याचा आरोपही सोनवणे यांनी केला. काही आरोपी सत्तेच्या काळातही फरार होते, असा दावा करत आपण मात्र कोणताही गुन्हा केलेला नसल्याने उघडपणे फिरत असल्याचं त्यांनी सांगितलं.
क्राईम, कॉमेडी आणि मैत्रीचा तडका; ‘क्लीन अप कंपनी’ 21ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला
आपल्या मुलाचा या हत्याकांडाशी काहीही संबंध नसताना त्याचं नाव आरोपी म्हणून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं काही लोकांकडून सांगितलं जात आहे. आधी नाव घ्यायचं, अटक करायची आणि नंतर सोडून द्यायचं, असा प्रकार होऊ नये, अशी भूमिका सोनवणे यांनी मांडली.
नेमकं काय घडलं होतं?
केज तालुक्यातील टाकळी येथे 20 जूनच्या रात्री एका वादातून विलास घुले यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. संबंधित वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! ‘त्या’ 6 खासदारांच्या बंडावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
घटनेनंतर बीड जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली होती. मुख्य आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिक आणि नातेवाईकांनी आंदोलन केलं. यावेळी रास्ता रोको करण्यात आला, तर विलास घुले यांचा मृतदेह तब्बल नऊ तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून प्रशासनाचा निषेध करण्यात आला होता.
त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देत कारवाई केली आणि या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र आता तपासाच्या पारदर्शकतेवरच खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केल्याने या प्रकरणाला नवं राजकीय वळण मिळालं आहे.
