Amit Shah : देशाचे गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असून आज त्यांनी नांदेडमध्ये आयोजित शंखनाद सभेत बोलताना ऑपरेशन सिंदूरवरुन शिवसेना ठाकरे गटावर टीका केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण (Ashokrao Chavan) देखील उपस्थित होते.
या सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी धर्म विचारुन 26 पर्यटकांची हत्या केली होती. मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या हल्ल्याचा बदला घेणार असा इशारा पाकिस्तानला (Pakistan) दिला होता. पहलगाम हल्ला करताना पाकिस्तान विसरला की गेल्या 11 वर्षांपासून भारतात भाजपची सरकार आहे. पाकिस्तानने उरीवर हल्ला केला तेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राईक केली. त्यांनी पुलवामा येथे हल्ला केला तेव्हा आम्ही एअर स्ट्राईक केली आणि आता त्यांनी पहलगाम येथे हल्ला केला तर आम्ही ऑपरेशन सिंदूरने (Operation Sindoor) उत्तर दिले असं गृहमंत्री अमित शाह म्हणाले. तसेच आम्ही ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना मारले असं देखील या सभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
या सभेत पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरने फक्त पाकिस्तानला नाहीतर संपूर्ण जगाला एक मेसेज दिला की, भारतीय सीमेसोबत काही केलं तर भारतीय सेना याचा प्रत्युत्तर देणार. जर कोणी आमच्यावर हल्ला केला तर गोळीचे उत्तर गोळीने दिले जाईल, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे. असं देखील अमित शाह म्हणाले. तर यावेळी ऑपरेशन सिंदूरवरुन शिवसेना ठाकरे गटावर देखील जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशात पाठविण्याचा निर्णय घेतला पण शिवसेनेच्या एका नेत्याने म्हटले होते की, कुणाची वरात जात आहे. मला समजत नाही या उद्धव सेनेला झाले तरी काय? एकेकाळी हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष होता.
Video : पहिल्याच पावसात मुंबईची ‘तुंबई’ होताच शिंदेंनी पावसावरचं फोडलं खापर; ऐका काय म्हणाले…
आज बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूरसाठी त्यांनी पंतप्रधान मोदींची गळा भेट घेतली असती पण आता उद्धव सेना सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडाळाला वरात म्हणतो ज्यात त्यांचेही खासदार आहे. अशी टीका या सभेत बोलताना अमित शाह यांनी ठाकरे गटावर केली. तसेच 31 मार्च 2026 पर्यंत या देशात एकही नक्षलवादी नसणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.