फक्त काश्मीरच नाही पाक व्याप्त कॉंग्रेसही आहे; ऑपरेशन सिंदूरवरून फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

फक्त काश्मीरच नाही पाक व्याप्त कॉंग्रेसही आहे; ऑपरेशन सिंदूरवरून फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

Devendra Fadanvis On Rahul Gandhi In Amit Shah Sabha At Nanded : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नांदेडमधून (Nanded) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा शंखनाद केलाय. यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पहलगाम हल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं.

Video : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई होताच शिंदेंनी पावसावरचं फोडलं खापर; ऐका काय म्हणाले…

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय सैन्याने केवळ पीओकेमधील नाही. तर थेट पाकमधील दहशतवादी अड्डे नष्ट केले. मोदींच्याम माध्यमातून हा विजय सैन्याने मिळवला. याचं देशभरात कौतुक होत आहे. सर्वस पक्षाती लोक प्रसंशा करत आहेत. मात्र कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जे प्रश्न पाकिस्तानने विचारायला हवेत ते प्रश्न राहुल गांधी विचारत आहेत. पण पाकिस्तानचं कंबरड मोडलं आहे. त्यांची प्रश्न विचारण्याची हिंत नाही. पण राहुल गांधी म्हणाले आहेत की, किती ड्रोन डागले? कुठे डागले?

अहिल्यादेवींचं प्रशासन अन् देवाभाऊंची तयारी, अमित शाहांसमोर अशोक चव्हाणांचा विजयी ‘शंखनाद’

तसेच कॉंग्रेसच्या एकाने भारतीय सैन्याने डागलेल्या क्षेपनास्त्र ही पाकच्या 15 हजारांच्या चायनीज ड्रोनला नष्ट करण्यासाठी वापरले गेल्याचं म्हटलं. जे शेतात वापरले जातात.पण त्या मुर्खांना शेतात वापरले जाणारे ड्रोन आणि बॉम्ब घेऊन येणारे ड्रोन यातील फरक माहिती नाही. पण भारतीय सैन्याने आपली ताकद दाखवत पाकचे ड्रोन नष्ट केले.
जी एस महानगर बँक! गीतांजली शेळके नेमक्या आहेत तरी कोण? जाणून घ्या

त्यामुळे मला इतके दिवस वाटत होतं की, फक्त पाक व्याप्त काश्मीरच आहे. पण आज मला काळाले की, पाक व्याप्त कॉंग्रेस देखील आहे. कारण पाकिस्तानी विचारांनी कॉंग्रेसच्या डोक्यावर पगडा निर्माण केला आहे. बरं तरी सैन्याने ऑपरेशन सिंदूरचे व्हि़डीओ जारी केले आहेत. असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पहलगाम हल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube