Banner War Between Shiv Sena and MNS over April Fools Day : कल्याण डोंबिवलीत एप्रिल फुलवरून राजकीय वाद पेटला आहे. मनसेने (MNS) सत्ताधाऱ्यांना झोंबणारे बॅनर्स लावले आहेत. तर याला शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमीच शिवसेना विरूद्ध भाजप (BJP) अन् शिवसेना (Shiv Sena) विरूद्ध मनसे असं शीतयुद्ध पाहायला मिळतंय. आता सुद्धा एप्रिल फुलवरून (April Fools Day) मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena and MNS) बॅनरबाजी रंगल्याचं समोर आलंय.
एक एप्रिलच्या निमित्ताने मनसेने सत्ताधाऱ्यांना डिवचणारं बॅनर लावलं होतं. डोबिंवलीतील पलावा पूल अन् एक एप्रिल यावर आधारीत हे बॅनर होतं. यालाच आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात (Maharashtra Politics) आलंय. तर एप्रिल फुलवरून डोंबिववीमध्ये राजकीय वॉर पाहायला मिळालं. एक एप्रिल रोजी एप्रिल फुल बनवत एकमेकांची खिल्ली उडवली जाते. याच पार्श्वभूमीवर मनसेचे राजू पाटील यांनी देखील एक बॅनर लावलं होतं. ज्यामुळे सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली गेली.
Video : ‘दुप्पट किंमत द्या…’ अनंत अंबानी यांनी खरेदी केल्या 250 कोंबड्या, कारण जाणून घ्या…
मनसेच्या बॅनरमध्ये नेमकं काय?
एक एप्रिलनिमित्त डोंबिवलीमध्ये मनसे माजी आमदार राजू पाटील यांनी एप्रिल फुल करणारं बॅनर लावलं होतं. पुलाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी राजू पाटील यांनी हे बॅनर लावलं होतं. आश्वासनांनी ‘फुल्ल’ ! कधी होणार दोन्ही पलावा पुल ?…की, बनत होता..बनत आहे.. बनतच राहील पलावा पूल ? उत्तर द्या. 31 एप्रिलला कुणाल कामरा याच्या हस्ते पलावा ब्रिजचे उदघाटन होणार, अशी बॅनर बाजी करण्यात आली होती. पलावा पुलाच्या विलंबावर राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला होता. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या हस्ते पुलाचे उद्घाटन होणार असं देखील बॅनरवर लिहिलं होतं, त्यामुळं अधिक चर्चा होतेय.
तारखांच्या आश्वासनांनी ‘फुल्ल’ !
कधी होणार दोन्ही पलावा पुल ?….की, बनत होता..बनत आहे.. बनतच राहील पलावा पूल ?
उत्तर द्या @mieknathshinde @MMRDAOfficial #वाट_बघा #वाट_लावलीय #AprilFool #Dombivali #kalyan_shil_road #palava #टक्केवारी #KD_यम_C #अनधिकृत_पलावा_जंक्शन #MNS pic.twitter.com/6b01fJUeT1— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) April 1, 2025
शिंदेंच्या शिलेदाराने काय उत्तर दिलं?
तर या बॅनरला आता शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांनी देखील टीकात्मक उत्तर दिलंय. त्यांनी देखील डोंबिवलीत एक बॅनर लावलं. या बॅनरवर लिहिलंय की, ‘आजच शपथविधी होणार’ आणि ‘जगभरातून राष्ट्राध्यक्ष कल्याणला येणार! ‘एप्रिल फुल…’ डोंबिवलीत मनसे अन् शिवसेनेच्या बॅनरबाजीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय. नागरिकांसाठी डोंबिवलीमधील कल्याण-शीळ रस्त्यावरील पलावा पूल अत्यंत महत्वाचा आहे. या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी हात असते. या पूलाचं काम अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे मनसेने बॅनरबाजी करत सर्वांचं लक्ष वेधलंय.