Download App

Video: चष्मा काढला अन् डोळे पुसले; शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल, व्हिडिओ व्हायरल

अजित पवार यांची काल बारामतीमध्ये सभा झाली होती. त्यावेळी पवार घराण्यातील फुटीबाबत बोलताना अजित पवार भावूक झाले होते.

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar on Ajit Pawar : लोकसभेप्रमाणे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापलं आहे. येथे अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार अशी थेट लढत होणार असं आता स्पष्ट झालं आहे. (Sharad Pawar ) आता स्वत: शरद पवार अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज अजित पवारांची थेट नक्कलच केली.

माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माझ्याविरोधात मुलानेच खटला भरला; पक्षातील बंडखोरीवर पवार थेटच बोलले

अजित पवार यांची काल बारामतीमध्ये सभा झाली होती. त्यावेळी पवार घराण्यातील फुटीबाबत बोलताना अजित पवार भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. शरद पवार यांनी आज बारामतीमधील सभेत अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली. शरद पवारांच्या या कृतीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शरद पवार यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शरद पवारांची अजितदादांवर घणाघाती टीका

बारामतीमधील पहिल्याच सभेत शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, घरात दोन भाऊ असतील तर एकाने शेती आणि दुसऱ्याने नोकरी करायची असते. आम्ही सत्ता लोकांसाठी वापरली, आम्ही रोजगार दिले. बारामतीत मलिदा गँग शब्द आहे. आम्ही ही गँग कधी वाढू दिली नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

मी पक्षात मी मार्गदर्शन करायची जबाबदारी घेतली आणि नवी पिढ्याच्या हातात अधिकार दिला. पण सत्ता नाही म्हणून सहकाऱ्यांनी आमचा साथ सोडली. आमच्या काही लोकांनी उद्योग केला आणि पहाटे शपथ घेतली, राज्यपाल यांना उठवले कशासाठी? चार महिन्यांनी पद मिळाले असते. पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असतं का? घर मोडणे माझा स्वभाव नाही. कुटुंब एक राहिले पाहिजे ही माझी भूमिका असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Tags

follow us