नागपूर : उद्धव ठाकरेंवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष भावासारखं प्रेम केलं, आज खूर्ची, सत्ता गेल्यानंतर तेच उद्धव ठाकरे दबावाखाली फडणवीसांवर वैयक्तिक टीका करत असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. नागपूर विमानतळावर आज बावनकुळेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते बोलत होते.
टी -20 लीगवर कोरोनाचे सावट, BCCI ने खेळाडूंसाठी केली नियमावली जारी
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, 2014 ते 2019 या काळात राज्यात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सत्तेत होते. त्यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी प्रत्येक विषयाची चर्चा करुनच निर्णय घेतले होते. मात्र, आज सत्ता गेल्याने दबावाखाली उद्धव ठाकरे फडणवीसांवर वैयक्तिक टीका करीत असल्याचं ते म्हणाले.
“इंग्रजांचे मित्र सिंधिया…” Jyotiraditya Scindia आणि Jairam Ramesh यांच्यात ट्विटरवरच वाद
तसेच उद्धव ठाकरे आज तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर पहिल्यांदाच वैयक्तिक स्वरुपात बोलले आहेत. ठाकरे अजूनही चूक झाल्याचं मान्य करीत नाहीत. पण तुम्हाला शेवटचं सांगतो, पुन्हा भाजपचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री अमित शाहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका केल्यास भाजप काय करेल हे दिसणार असल्याचा पुन्हा इशारा बावनकुळेंनी दिला आहे.
Gautami Patil : कपडे बदलतांनाचा ‘त्या’ व्हिडिओवरून गौतमी पाटीलचा खुलासा
उद्धव ठाकरेंकडून फडणवीस यांचा फडतूस गृहमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. भाजपच्या अनेक नेत्यांकडून ठाकरेंना टार्गेट केलं जात होतं.
फडणवीसांनी फडतूस म्हंटल्यानंतर घराबाहेर फिरु देणार नसल्याचा इशारा बावनकुळेंनी ठाकरेंना दिला होता. तर काल ठाकरे गटाच्या नेत्यांकडून ठाण्यातल्या महामोर्चाच्या सभेतून बावनकुळेंचा समाचार घेण्यात आला. दरम्यान, आज भाजपचे नेते बावनकुळेंनी फडणवीसांवर पाच वर्ष भावासारखं प्रेम केलं असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.