झाशीच्या राणीशी ग्वाल्हेरच्या शिंदेंची गद्दारी ; ज्योतिरादित्य आणि जयराम रमेश यांच्यात वाद रंगला..
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यात ट्विटरवर जोरदार शाब्दिक वाद पाहायला मिळाला आहे. त्यांचा वाद सुरु असतानाच त्यावर लोकांनीही विविध प्रतिक्रिया देत शाब्दिक चिमटे काढायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे मीडिया सेलचे प्रमुख असलेल्या जयराम रमेश यांनी राहुल गांधी यांच्यावर सिंधियाच्या टीकेला उत्तर दिले होते. ज्यात रमेश यांनी सिंधिया यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. त्यावरून सोशल मीडियावरच दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.
या पोस्टमुळे वाद सुरु झाला
या वादाची सुरुवात झाली जयराम रमेश यांच्या एका ट्विटमुळे. रमेश यांनी एक ट्विट केलं होत, त्यात त्यांनी म्हटलं होत की, “गुलाम नबी आझाद आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे दोघेही काँग्रेस व्यवस्थेचे आणि पक्ष नेतृत्वाचे प्रचंड लाभार्थी आहेत. पण आता प्रत्येक दिवसागणिक ते हे सिद्ध करतात की ते या औदार्याला पात्र नव्हते. ते त्याचे खरे पात्र दाखवत आहेत, जे त्यांनी इतके दिवस लपवून ठेवले होते.”
जयराम रमेश यांच्या या ट्विटला सिंधिया यांनी लगेच उत्तर दिलं. त्यांनी त्यांच्या या ट्विटला उत्तर देताना सिंधिया म्हणाले की, “मुंह में राम बगल में छुरी! तुमच्या अशा विधानांवरून काँग्रेसमध्ये किती प्रतिष्ठा आणि विचारधारा शिल्लक आहे, हे स्पष्ट होते. तसंही तुम्ही स्वतःला समर्पित आहात; त्यामुळे तुमचे राजकारण जिवंत आहे. मी आणि माझे कुटुंब नेहमीच जनतेला उत्तरदायी आहे.
मुंह में राम बगल में छुरी! आपके ऐसे वक्तव्य साफ दर्शाते है कि कितनी मर्यादा व विचारधारा कांग्रेस में बची है । वैसे भी आप केवल स्वयं के प्रति समर्पित हैं; इसी से आपकी राजनीति जीवित है। मैं और मेरा परिवार हमेशा जनता के प्रति जवाबदेह रहें है। https://t.co/57bNHdMlag
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) April 5, 2023
झाशीच्या राणीशी शिंदेंची गद्दारी
दरम्यान जयराम रमेश यांनी आणखी एक ट्विट केलं. त्यावर मोठी चर्चा झाली. रमेश यांनी एक ट्विट केले होते की, ते (ज्योतिरादित्य सिंधिया) सुभद्रा कुमारी चौहान यांची झाशीच्या राणीवरील अजरामर कविता विसरले आहेत का?
यावेळी त्यांनी ती कविताही ट्विट केली होती. “अंग्रेज़ों के मित्र सिंधिया ने छोड़ी राजधानी थी, बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी” हि कविता त्यांनी ट्विट केली
जयराम रमेश यांच्या या ट्विटवर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या ग्लिपसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकाचा संदर्भ देत, “कविता कमी आणि इतिहास जास्त वाचा.” अशी टीका केली.
कविताएँ कम और इतिहास ज़्यादा पढ़ें।
“Thus they (Marathas) had practically inherited the Delhi Empire.The Marathas remained to challenge British supremacy.But the Maratha power went to pieces after the death of Mahadji Scindia”
– Nehru in his book ‘Glimpses of World History’
1/3 https://t.co/AI2J8kr13H— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) April 5, 2023
…म्हणून अमृतपालच्या वकिलाला उच्च न्यायालयाने फटकारलं!
पंडित नेहरू यांच्या “ग्लिपसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री” पुस्तकातील उताऱ्यानुसार, “अशा प्रकारे त्यांनी (मराठ्यांनी) दिल्ली जिंकली. मराठे ब्रिटिश वर्चस्वाला आव्हान देत राहिले. पण ग्वाल्हेरच्या महादजी सिंधिया यांच्या मृत्यूनंतर मराठा सत्तेचे विघटन झाले.” हा संदर्भ सिंधिया यांनी दिला.
सावरकरांचा संदर्भ देत जयराम रमेश यांचे उत्तर
सिंधिया यांनी दिलेल्या उत्तरावर जयराम रमेश यांनीही त्यांना पुन्हा प्रत्युत्तर दिले. त्यात त्यांनी म्हटले की, “इतिहासाचे कोणतेही पुस्तक घ्या. १८५७ मध्ये झाशीच्या राणीशी झालेल्या विश्वासघाताच्या मुद्द्यावर सर्व इतिहासकारांचे एकमत आहे. तुमचा नवे भगवान सावरकर यांनीही राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि इतरांसोबत सिंधियाच्या विश्वासघाताचा उल्लेख त्यांच्या ‘१८५७ चे स्वातंत्रसमर’ या पुस्तकात केला आहे. तुम्हीही इतिहास वाचा.” असा टोला रमेश यांनी सिंधिया यांना लगावला.
इतिहास की कोई किताब उठा लीजिये। 1857 में रानी झांसी के साथ गद्दारी के मुद्दे पर सभी इतिहासकार एकमत हैं। आपके नये भगवान सावरकर ने भी अपनी किताब '1857 का स्वातंत्र समर' में रानी लक्ष्मीबाई, तात्या टोपे और अन्य लोगों के साथ सिंधिया की गद्दारी का जिक्र किया है। इतिहास आप पढ़िये https://t.co/kbgI0XPp54
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) April 6, 2023
मराठे आजही एक आहेत
जयराम रमेश यांनी केलेल्या विश्वास घाताच्या टिकेकर सिंधिया यांनी पुन्हा उत्तर दिले. त्यात त्यांनी म्हटले की, “१८५७ चे शूर शहीद तात्या टोपे यांचे वंशज पराग टोपे यांनी लिहिलेले ‘ऑपरेशन रेड लोटस’ हे पुस्तक कधीतर वाचा. इंग्रजांच्या विरोधात आम्ही मराठे – सिंधिया, पेशवे आणि झाशीचे नेवाळकर कसे एकत्र होतो, ते कळेल.”
विधानसभा निवडणूक कधी होणार, बावनकुळेंनी महिना सांगून टाकला..
याच ट्विटमध्ये सिंधिया पुढे म्हणाले की, “मराठा अजूनही एक आहेत. त्यामुळे हे विभाजनाचे राजकारण थांबवा.” असा सल्ला देखील त्यांनी रमेश यांना दिला.
कभी 1857 के वीर शहीद तात्या टोपे के वंशज पराग टोपे की ख़ुद की लिखी किताब ‘Operation Red Lotus’ पढ़िए; ज्ञात हो जाएगा कि किस प्रकार हम मराठे – सिंधिया, पेशवा और झाँसी के नेवालकर अंग्रेजों के विरुद्ध एक साथ थे।
मराठा आज भी एक हैं। कृपया यह “विभाजनकारी” राजनीति बंद करें। https://t.co/fzB84soMLv
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) April 6, 2023
ज्योतिरादित्य सिंधिया आणि जयराम रमेश यांच्यातील या ट्विटरवर वादाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. एकेकाळी हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये सोबत होते, पण सिंधिया यांनी काँग्रेसला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ते सध्या आपल्या जुन्या पक्षावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.
जयराम रमेश यांना मीडिया सेलची जबाबदारी दिली आहे, त्यामुळे काँग्रेस नेत्यांवर केलेल्या टीकेला ते आक्रमकपणे उत्तर देताना दिसतात. त्यात राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यास ते लगेच त्याला उत्तर देताना दिसतात. त्यातून ट्विटरवर ज्योतिरादित्य सिंधिया आणि जयराम रमेश हा वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळालं आहे. सध्या तरी त्याच्या एकमेकांवरच्या टीकेचा हा थ्रेड बराच मोठा झाला आहे. त्यात अजून किती वाढ होणार, हे देखील पाहायला मिळेल.
लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया
ज्योतिरादित्य सिंधिया आणि जयराम रमेश यांच्यातील वाद ट्विटरवर सुरु झाला पण त्यावर सामान्य लोकांकडून देखील त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षातील समर्थक एकमेकांना उत्तर देताना दिसत आहे.
अशीच एक प्रतिक्रिया राज मीना बस्सी यांनी दिली आहे. रमेश यांना उत्तर देताना त्यांनी म्हटले की, “देशाचा इतिहास काहीही असो, पण तुमचा इतिहास चमच्याचाच राहील.”
भाई साहब देश का इतिहास कुछ भी हो पर आपका इतिहास तो चमचे का ही रहेगा
— RAJ MEENA (@Iamrajmantwal) April 6, 2023
याशिवाय आणखी एका युअरने लिहले आहे की, “सिंधिया जी, तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, काँग्रेसने या प्रकरणी तुमचा अनेकदा बचाव केला होता, पण भाजपचा एकही नेता तुमच्या मदतीला आला नाही.”