टी -20 लीगवर कोरोनाचे सावट, BCCI ने खेळाडूंसाठी केली नियमावली जारी

  • Written By: Published:
टी -20 लीगवर कोरोनाचे सावट, BCCI ने खेळाडूंसाठी केली नियमावली जारी

नवी दिल्ली : लीग 2023 सुरू होऊन आठ दिवस झाले आहे. या मोसमात आतापर्यंत 8 सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा देशात डोकेवर काढले आहे. कोविड-19 देशाच्या अनेक भागात पसरत आहे. दिल्लीसह अनेक ठिकाणी त्याची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. हे लक्षात घेऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंसाठी नियमावली जारी केली आहे. बीसीसीआयने खेळाडूंना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, गुरुवारी देशात कोरोनाची 25 हजार सक्रिय रुग्ण आहेत. इंडिया टुडेवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, बीसीसीआयने टी -20 लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना विषाणूचे दिवसेंदिवस वाढत चाललेले रुग्ण चिंतेत भर घालत आहेत. खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा आमच्यासाठी प्राधान्य आहे. सरकारकडून जे काही मार्गदर्शक तत्त्वे येतील, त्यांचे पालन केले जाईल.

Gautami Patil : कपडे बदलतांनाचा ‘त्या’ व्हिडिओवरून गौतमी पाटीलचा खुलासा 

टी -20 लीगमध्ये गुजरात सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांनी 2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. पंजाब दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. बंगळुरूने एक सामना खेळला आणि एक जिंकला. या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली तर ऋतुराज गायकवाड पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 2 सामन्यात 149 धावा केल्या आहेत. काइल मेयर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. मेयर्सने 2 सामन्यात 126 धावा केल्या आहेत. शिखर धवननेही 126 धावा केल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube