Download App

काळजी घ्या! राज्यात पुन्हा कोरोना वाढतोयं, दोघांचा मृत्यू…

मुंबई : कोरोनाचं संकट पूर्णपणे अद्याप दुर झालेलं नसून राज्यात 437 नवीन कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातली आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. एकीकडे रुग्ण वाढताहेत तर दुसरीकडे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तुम्हाला सत्ता हवी, मंत्री व्हायचे आहे पण काम करायचे नाही; अजितदादांनी सुनावले

आत्तापर्यंत राज्यात 1956 कोरोनाबाधिक रुग्णांवर उपचार सुरु असून प्रयोगशाळेत आत्तापर्यंत एकूण 8,65,71,795 एवढ्या रुग्णांच्या कोरोना तपासण्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या तपासण्यांमध्ये 9.40 टक्के नमुने हे कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा धडकी भरल्याचं दिसतंय.

काळ्या ड्रेसमध्ये अनुष्का शर्माचे घायाळ करणारे फोटो, तरुणींनाही ही फॅशन फॉलो करायला आवडेल

कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचं सर्वाधिक प्रमाण पुण्यात असून पुण्यात आत्तापर्यंत 571 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर मुंबई आणि ठाण्यातही कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचं दिसून येत आहे. तर राज्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून हा मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.

Rahul Gandhi Press Conference Highlight : काँग्रेस नेते राहुल गांधीच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख १० मुद्दे

दरम्यान, एकीकडे कोरोनाचा प्रसार वाढतोय तर दुसरीकडे कोरोनाबाधिक रुग्ण ठणठणीत बरे होताना दिसून येत आहेत. आत्तापर्यंत राज्यात 79, 97, 66 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचं समोर आलंय. तर 242 रुग्ण बरे झाले आहेत.

Tags

follow us