Download App

धक्कादायक! 50 हजार रुपयांसाठी तरुणाचे अपहरण; बीड पुन्हा हादरलं

Kidnapping For rs 50 Thousand In Dharur Taluka : मागील काही दिवसांपासून बीड (Beed) जिल्हा गुन्हेगारीमुळे चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान, अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. केवळ 50 हजार रूपयांसाठी एका तरूणांचं अपहरण (Kidnapping) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. धारूरमध्ये हा संतापजनक (Crime News) प्रकार उघडकीस आला आहे.

50 हजार रूपये टाका अन्यथा

उसने पैसे वसूल करण्यासाठी चार तरूणांनी हा कारनामा केला. त्यांनी एका तरूणाचं अपहरण करून त्याच्या घरी फोन केला. ‘मुलगा जिवंत हवा असेल तर लगेचच आता 50 हजार रूपये टाका अन्यथा तुम्हाला मुलगा पुन्हा दिसणार नाही’ अशी थेट धमकी त्यांनी फोनवरून दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली अन् दोघांना याप्रकरणी अटक देखील केली.

निवडणूक आयोग पुरावे नष्ट करतो, मॅच फिक्स आहे; राहुल गांधींचा हल्लाबोल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यामध्ये दहा हजार रूपयांच्या उसन्या पैशावरून 80 हजार रूपयांची वसुली करण्यासाठी तरूणाचं अपहरण करण्यात आलं होतं. आरोपींनी तरूणाच्या आईला फोन करत धमकी दिली. मुलगा जिवंत असल्यास पन्नास हजार रूपये पाठवा, अन्यथा तो कधीच दिसणार नाही अशा शब्दांत आरोपींनी धमकावलं होतं. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. कृष्णा मैंद असं अपहरण झालेल्या तरूणाचं नाव आहे.

तरूणांचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार

काही दिवसांपूर्वी कृष्णाने धनराज चाटे, पृथ्वीराज राग आणि परमेश्वर आगाव नावाच्या व्यक्तींकडून 10 हजार रुपये उसने घेतले होते. या रकमेवर आरोपींनी दिवसाला चक्क एक हजार रूपयांचे व्याज लावलेले होते. आपले पैसे परत मिळवण्यासाठी आरोपींनी कृष्णाचं अपहरण केलं अन् फोनवरून त्याच्या आईकडे पन्नास हजार रूपयांची मागणी केली.

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर ‘DGCA’चा मोठा निर्णय; ‘या’ ३ अधिकाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

पीडित तरूणाच्या आईने थेट पोलीस ठाणे गाठले अन् पोलिसांत तक्रार दिली. धारूर पोलिसांनी याप्रकरणी अंबाजोगाई जवळील साकुर येथून दोन आरोपींना अटक केली आहे. तर इतर दोन आरोपी फरार असल्याचं कळतंय. अपहरण झालेल्या कृष्णा मैंदवर सध्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेवरून पुन्हा बीडमधील गुन्हेगारीला कधी आळा बसणार, असा सवाल उपस्थित होतोय.

 

follow us