Bharat Gogawale On Sunil Tatkare : रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावरुन येत्या काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत बैठक करून तोडगा काढण्याच्या हालचाली सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस (Sunil Tatkare) विद्यमान पालकमंत्री कायम ठेवणार की नवनियुक्त करणार याकडं लक्ष सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हे सगळं सुरू असताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्यात टोलेबाजी सुरु असल्याचं दिसून येत आहे. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेऊ, असा इशारा भरत गोगावले यांनी नाव न घेता सुनील तटकरेंना दिला आहे.
मोठी बातमी : परकी बहीण लाडकीच राहणार; अपात्र महिलांकडून वसुली नाही; आदिती तटकरेंची घोषणा
अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे येथे स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर प्रवेशद्वार नामकरण सोहळ्याचं उद्घाटन प्रसंगी आज पुन्हा एकदा शिंदे सेनेच्या आमदारांकडून खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी विरूद्ध शिंदे सेना वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात एकमेव रायगडाची लोकसभेची जागा आणण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. आमची चूक झाली असेल तर आम्ही मंत्रिपद सोडू. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. कावळे नाही. कोणी आमच्या अंगार आलं तर आम्ही शिंगावर घेऊ असा टोला भरत गोगावले यांनी नाव न घेता सुनील तटकरेंना लगावला.
आमदार महेंद्र दळवी काय म्हणाले?
महायुतीचे सरकार दुसऱ्यांदा बनवण्यात महिलांचा मोठा हातभार आहे. भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होतील यासाठी आम्ही आजही प्रयत्नशील, आग्रही आहोत. खासदार सुनील तटकरे यांनी नेहमी प्रमाणे राजकारण करत आदिती तटकरे यांना पालकमंत्री केलं. पण सुनील तटकरे यांनी लक्षात घ्यावं की येथील मोठी घराणेशाही आम्ही संपवली. आता दुसरी घराणेशाही देखील संपवणार आणि तटकरेंना पहिल्या बाकावरुन शेवटच्या बाकावर बसवणार, असा सल्लड दम शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंना दिला.