Download App

तेलंगणाचा धुरळा बसताच ‘महाराष्ट्रावर’ फोकस : 288 जागा लढविण्याच्या घोषणेसह बीआरएसने थोपटले दंड

पुणे : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या नेतृत्वात भारत राष्ट्र समिती (BRS) आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व 288 जागा लढविणार आहे. यासाठी पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे, अशी माहिती भारत राष्ट्र किसान (BRS) समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम (Manik Kadam) यांनी दिली. त्यामुळे आता तेलंगणा विधानसभा निवडणुकांचा धुरळा बसताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठी चुरस रंगण्याची शक्यता आहे. (Bharat Rashtra Samiti will contest all the 288 seats of the Legislative Assembly in Maharashtra in the upcoming elections)

Sanjay Raut : हे सरकार पराभवाच्या भीतीने घाबरलयं; नॅशनल हेराल्डवरून राऊतांची टीका

कदम म्हणाले, आतापर्यंत पक्षाने सर्वच विधानसभा मतदार संघात समन्वयक नेमले आहेत. या समन्वयकांना टॅब आणि अन्य साधन सामग्री पुरवण्यात आली आहे. याशिवाय राज्यात सुमारे 20 लाख 85 हजार पदसिद्ध पदाधिकाऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शिवाय 17 हजार गावांमध्ये पदाधिकारी नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता दोन महिन्यांत तब्बल दोन कोटींहून अधिक जणांची सदस्य नोंदणी करण्याचे उद्दीष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता राज्यात विभागनिहाय कार्यालय स्थापन करून पक्ष विस्ताराचे काम केले जाणार आहे. सोबतच आपल्या पदाधिकाऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2 ते 5 लाख रुपयांचा निधी वर्ग केल्याचेही सांगितले जात आहे.

प्रफुल्ल पटेलांची खासदारकी रद्द करा, शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाची उपराष्ट्रपतींकडे मागणी

माजी आमदार- खासदाराचा प्रवेश

आतापर्यंत 3 माजी खासदार व 15 माजी आमदार महोदयांना केसीआर यांनी पक्षाच्या गोटात दाखल करुन घेतलं आहे.  यात उदगीरचे माजी आमदार मोहन पटवारी, यवतमाळचे माजी आमदार राजू तोडसाम, ठाणे जिल्ह्यातील माजी आमदार दिगंबर भिसे, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, माजी आमदार शंकर धोंडगे, माजी आमदार नागनाथ घिसेवाड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार दीपक आत्राम, सोलापूर जिल्ह्यातील बडे नेते भगीरथ भालके यांचा समावेश आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवत त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणातही प्रवेश केला आहे.  एकूणच केसीआर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमका करण्याच्या तयारीत आहेत.

Tags

follow us