Download App

‘फडणवीसांनी मनावर घेतल्यावरच आरक्षण मिळणार? भास्कर जाधवचा CM शिंदेंवर निशाणा

Bhaskar Jadhav On CM Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे मराठा आरक्षणाचा (Martha Reservation) खेळ खंडोबा करतात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातच आरक्षण टिकले नाही हे खर आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गेले का…? जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मनावरती घेत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी किती शपथा घेतल्या तरी मराठा आरक्षण मिळणार नाही, असा खोचक टोला ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मुख्यमंत्री शिंदे (CM) यांना लगावला.

https://www.youtube.com/watch?v=ImhAo4nnOLE

1972 चा काल शरद पवार यांनी पाहिला आहे अनुभवला आहे. आपण निर्यातदार म्हणून मिरवतोय हे पवार साहेबांचं कर्तुत्व आहे. शरद पवार यांच रेकॉर्ड वाचायला कदाचित म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळ नसेल, त्यामुळे अशा पद्धतीने शरद पवार यांच्यावर टीका करत असतील. विधानसभा अध्यक्षांकडून काही होणार नाही, बंडखोर गटाला पक्ष निशाणी देण्याचं काम हे इथे घडत आहे. कॅग महालेखापाल 1948 ला स्थापन झाली, या सरकारचे घोटाळे बाहेर काढले म्हणून cag संस्था बंद करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांकडून न्याय मिळेल याची काडी मात्र आशा ठेवण्याची आवश्यकता नाही, असा आरोपही आमदार भास्कर जाधव यांनी केला.

Supriya Sule : ‘मोदींच्या काळातच शरद पवारांना पद्मविभूषण’; सुळेंनीही सांगितली जुनी आठवण

नरेंद्र मोदी प्रचार मंत्री प्रधानमंत्री नाही. उद्धव ठाकरे राजकारणात कधीच छक्के पंजे करत नाहीत. नियतीनेच त्यांना मुख्यमंत्री केला आहे. मला चिपळूण मधून निवडणूक लढवण्याची इच्छा मी अजून पर्यंत बोललो नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये हा विषय आहे. शरद पवार यांच्या गटाचा आमदार किती मध्ये गेला आहे. लढायला मी अजून काही कमी नाही. अब्दुल सत्तार यांच्यापर्यंत मराठा आरक्षणाचा विषय घेण्याची वेळ आली. मराठा समाजाचा संयम सुटत असेल तर तो का सुटतो याचा अभ्यास करण्याची वेळ आहे. यांच्यावर बोलताना घाबरतात पण मी त्यांच्याविरोधात बोलतो. 2010 सनी अशोक चव्हाण असताना जीआर काढला होता. जुनं फक्त काढायचं सांगायच ही भाजपची जुनी खोड. कंत्राटी कामगारांचं पाप हे तुमचंच आहे, अशी घणाघाती टीका आमदार भास्कर जाधव यांनी केला.

नितीन गडकरी यांचे भाषण खुसखुशीत असतात. गडकरींची ही रंगतदार भाषण मी चालू करतो आणि मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करतो. गडकरी यांचा मी आदर करतो भास्कर जाधव यांचा गडकरींवर उपहासात्मक टोला. हाउद्या चर्चा कार्यक्रमांना दिल्लीची खुर्ची हलवली आहे. चिपळूणचा मतदारसंघ मी मागितला तर पवार साहेबांना आणखीन एक मतदारसंघ द्यावा लागेल, असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

Tags

follow us