Bhushi Dam Accident : लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये (Bhushi Dam) 30 जून रोजी एकच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मुत्यू झाला होता. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार तर त्यांचा जीव वाचाल असता.
माहितीनुसार, लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये 30 जून रोजी अन्सारी कुटुंबातील पाच जणांचा पाण्यात बुडून मुत्यू झाला होता. अन्सारी कुटुंब आग्र्याहून पुण्यात नातेवाईकाच्या लग्नासाठी आले होते. लग्नानंतर अन्सारी कुटुंब पिकनिकला भूशी डॅम येथे आला होता. मात्र अचानक भुशी धरणाच्या पाण्याचा स्तर वाढल्याने या कुटुंबातील पाचही जणांचा पाण्यात बुडून मुत्यू झाला. धरणाच्या बॅक वॉटरमध्ये हे लोक पर्यटनाचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाचही जणांचा मुत्यू झाला.
साहिस्ता लियाकत अन्सारी (वय- 36), अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 13), उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 8), अदनान अन्सारी (वय- 4) आणि मारिया अन्सारी (वय- 9) असे पाण्यात वाहून गेलेल्यांचे नाव आहे.
तर जीव वाचला असता
माहितीनुसार, धरणाच्य या परिसरात जाण्यासाठी बंदी होती मात्र तरीही देखील अन्सारी कुटुंब या धबधब्याकडे आले. त्यांच्यापैकी कुणीही धबधब्याच्या परिसरातील सावधानतेचा सूचना फलक वाचला नाही. जर त्यांनी सूचना फलक वाचला असता तर त्यांचा जीव वाचला असता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तर दुसरीकडे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी (Pune Collector Suhas Diwas) मोठा निर्णय घेत लोणावळ्यात संध्याकाळी 6 नंतर पर्यटकांसाठी संचारबंदी लागू करण्याचा आदेश दिले आहे. तसेच येत्या काही तासात लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर होणार.
‘टंकलेखन’ परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ, MPSC कडून परीक्षा रद्द
विकेंड आणि सार्वजनिक सुट्याच्या दिवशी लोणावळा आणि खंडाळा येथील विविध पॉईंटवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र आता सर्व पर्यटकांना जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. जर असं झाले नाहीतर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. अशी देखील माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी दिली आहे.
‘स्वतःला हिंदू म्हणणारे …,’ राहुल गांधींचं हिंदू धर्मावर वादग्रस्त विधान, मोदीही नाराज