‘स्वतःला हिंदू म्हणणारे …,’ राहुल गांधींचा हिंदू धर्मावर वादग्रस्त विधान, मोदीही नाराज

‘स्वतःला हिंदू म्हणणारे …,’ राहुल गांधींचा हिंदू धर्मावर वादग्रस्त विधान, मोदीही नाराज

Rahul Gandhi : संसदेचा सध्या अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने भाजपवर (BJP) हल्ला करताना दिसत आहे. आज देखील त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपवर हल्ला करताना राहुल गांधी यांनी सभागृहात भगवान शिवचे चित्र दाखवत भाजप विरोधात आम्हाला लढण्यास मदत झाली असं ते म्हणाले. मात्र दुसरीकडे त्यांनी जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते नेहमीच हिंसाचार करतात असं देखील म्हटले आहे. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला होता.

राहुल गांधी यांच्या विधानावर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आक्षेप घेतला. तसेच गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, मी भाजप, आरएसएस आणि मोदींना हिंसक म्हटले आहे. संपूर्ण हिंदू समाजाला नाही.

राहुल यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, हा मुद्दा गंभीर आहे. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर बाब आहे. त्यावर राहुल गांधी म्हणाले, मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही किंवा आरएसएस म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही. असं राहुल गांधी म्हणाले.

तर दुसरीकडे या प्रकरणावर अमित शहा यांनीही तीव्र आक्षेप नोंदवत राहुल गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागावी, असे म्हटले आहे. एवढी मोठी घटना आवाज करून लपवता येणार नाही. स्वत:ला हिंदू म्हणणारे हिंसाचार करतात, असे विरोधी पक्षनेते म्हणाले. मी पुन्हा पुन्हा सांगतो की जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते हिंसाचारावर बोलतात. हिंसा करतात ? असा प्रश्न अमित शहा उपस्थित केला.

पुढे शहा म्हणाले, कदाचित त्यांना माहित नसेल की या देशात करोडो लोक अभिमानाने स्वतःला हिंदू म्हणवतात. ते सर्व लोक हिंसाचाराबद्दल बोलतात का? हिंसाचाराची भावना कोणत्याही धर्माशी जोडणे योग्य नाही. घटनात्मक पदावर असलेले राहुल गांधी यांनी माफी मागावी.

Mirzapur 3: काय सांगता! ‘मिर्झापूर 3’ मध्ये ‘पंचायत’ मधल्या ‘सचिवजीं’ची एन्ट्री? गुड्डू भैयाने केला खुलासा

तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, आपल्यात संवेदनशीलता असायला हवी आणि कोणत्याही समाजाबद्दल अशी टिप्पणी करणे मला चुकीचे वाटते. आक्षेपार्ह गोष्टी टाळाव्या लागतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube