Download App

अजित पवारांकडून मोठी घोषणा, मुंबईसह ‘या’ शहरात पेट्रोल – डिझेलचे दर कमी होणार

Maharashtra Budget 2024 : आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर

  • Written By: Last Updated:

Maharashtra Budget 2024 : आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर (Maharashtra Budget 2024) केला आहे. या अर्थसंकल्पात अजित पवार यांच्याकडून शेतकरी, महिलांसाठी मोठं मोठ्या घोषणा करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे सरकारने मुंबईसह एमएमआरडीच्या भागात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol and Diesel Price) कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कपात करण्यात यावी अशी मागणी होत होती. तर आता आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईसह एमएमआरडीच्या भागात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे.

आज जाहीर करण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर आता सर्वसामान्य नागरिकांसह, व्यापार आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.

अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये डिझेलवरील कर 24 टक्क्यांवरुन 21 टक्के करण्यात येणार आहे तर पेट्रोलवरील 26 टक्केवरून 25 टक्के प्रति लिटर करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात येणार आहे. माहितीनुसार, या भागात पेट्रोलमध्ये प्रति लिटर 65 पैसे तर डिझेलमध्ये प्रति लिटर 2.7 पैशाची कपात करण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे राज्यातील अनेक शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी पूर्ण केली आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली होती.

‘चादर लगी फटने, खैरात लगी बटने’ जयंत पाटलांचा टोला

तर सरकारने सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी टीका करत ‘चादर लगी फटने, खैरात लगी बटने’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, महायुतीला लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) फटका एवढा मोठा आहे की मराठीत एक म्हण आहे ‘चादर लगी फटने, खैरात लगी बटने’ सध्या महायुतीची चादर फाटली असून त्यांच्याकडून खैरात वाटली जात आहे.

शेतकरी, महिलांसाठी अजित पवारांकडून मोठ्या घोषणा, एका क्लीकवर जाणून घ्या संपूर्ण अर्थसंकल्प

या सरकारला खात्री झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपलं पराभव होणार आहे. त्यामुळे सरकारने हा शेवटचा प्रयत्न केला आहे. मात्र हा ही प्रयत्न फक्त अडीच तीन महिण्यासाठी आहे. कारण तीन महिन्यात आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे सरकार फक्त तीन महिने मोठं मोठ्या घोषणा करणार आहे. असं जयंत पाटील म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज