Download App

Big News ! मराठवाड्यात खुलं झालं रोजगाराचं द्वार; फडणवीसांनी ट्विट करत दिली मोठी बातमी

एकीकडे तरूणांना रोजगाराच्या संधी मिळत नसल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला जात आहे.

  • Written By: Last Updated:

मुंबई : एकीकडे तरूणांना रोजगाराच्या संधी मिळत नसल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला जात आहे. या सर्व गोंधळाच्या वातावरणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तरूणांना मोठी बातमी दिली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी मराठवाड्याची राजधानी छ.संभाजीनगरमध्ये ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील दिग्गज कंपनी दोन हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, यामुळे हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे. (Ather Energy plans to build third plant in Maharashtra’s Aurangabad)

फडणवीसांनी काय दिली माहिती?

फडणवीसांना एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील दिग्गज कंपनी एथरने (Ather Automotive) महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे महाराष्ट्रात स्वागत असून, तिसरा उत्पादन प्लांटसाठी एथरने औद्योगिक शहर असणाऱ्या छ.संभाजीनगर शहराची निवड केली आहे. हा प्लांट बिडकीन येथे असणार आहे. Ather चे असेंबली प्लांट आणि बॅटरी प्लांट तामिलनाडूतील होसूर येथे आहेत. त्यानंतर तिसरा प्लांट महाराष्ट्रातील छ.संभाजीनगर येथे उभारला जाणार आहे.

Video : ओम बिर्लांना शुभेच्छा देताना तटकरेंनी गाजवली लोकसभा; शाहंसह राजनाथही ऐकत राहिले

एथर एनर्जीचे संस्थापक, स्वप्नील जैन यांच्याशी नुकतीच भेट झाली या बैठकीत त्यांनी अथर एनर्जी या अग्रगण्य इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादनाचा तिसरा प्लांट छ.संभाजीनगरमध्ये उभा करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार औद्योगिक शहर (AURIC). मध्ये 2000 कोटींहून अधिक गुंतवणूक केली जाणार असून, सुमारे 4000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

भारत जोडोनंतर आता आषाढी वारी? राहुल गांधी करणार ‘विठु नामाचा’ गजर

हा अत्याधुनिक प्लांट दरवर्षी 1 दशलक्ष युनिटपर्यंत वाहने आणि बॅटरी पॅक दोन्ही तयार करेले असेही फडणवीसांना त्यांच्या पोस्टमध्ये नमुद केले आहे. एथरने छत्रपती संभाजीनगरची निवड हा मराठवाड्याची आणि महाराष्ट्राच्या विकासकथेचे नेतृत्व करेल. एथर कंपनीने छत्रपती संभाजीनगराच्या केलेल्या निवडीतून हेचअधोरेखित होत आहे की, भविष्यात मराठवाडा महाराष्ट्राच्या विकासकथेचे नेतृत्व करेल. समृद्धी द्रुतगती मार्गाद्वारे प्रभावी कनेक्टिव्हिटीमुळे, गुंतवणूकदार या प्रदेशाची क्षमता वाढवत असून, नरेंद्र मोदी यांचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होत आहे. ही तर फक्त सुरूवात असल्याचेही फडणवीसांनी म्हटले आहे. 

follow us