Salman Khan House Firing Update : बॉलीवूडचा (Bollywood ) सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर आज (14 एप्रिल) गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police) सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर (Galaxy apartment) सुरक्षा वाढवली आहे तर आता या गोळीबार प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) भाऊ अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) याने गोळीबार केल्याचा दावा एका फेसबुक (Facebook) पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
लॉरेन्सच्या भावाने घेतली जबाबदारी?
या व्हायरल पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेत राहणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, ओम ओम जय श्री राम, जय गुरुजी जांभेश्वर, जय गुरु दयानंद सरस्वती, जय भारत आम्हाला शांतता हवी आहे, दडपशाहीविरोधात निर्णय युद्धातून घेतला गेला तर युद्ध योग्य आहे. सलमान खान, आम्ही तुम्हाला ट्रेलर दाखवण्यासाठी हे केले आहे, जेणेकरून तुम्हाला आमची ताकद समजेल. हा पहिला आणि शेवटचा इशारा आहे, त्यानंतर रिकाम्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत. मला जास्त बोलायची सवय नाही. लॉरेन्स बिश्नोई ग्रुप, गोल्डी ब्रार ग्रुप, कला जथेडी ग्रुप, रोहित गोदरा ग्रुप. असं या व्हायरल पोस्टमध्ये लिहिण्यात आला आहे.
आत्तापर्यंत काय झाले?
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. यामुळे सलमान खानला मुंबई पोलिसांकडून सुरक्षा देखील देण्यात आली आहे. मात्र रविवारी पहाटे 4.50 वाजता दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पाच राऊंड गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. माहितीनुसार, हल्लेखोरांनी 7.65 मिमी बोअरचे पिस्तूल वापरले होते.
माहितीनुसार, रविवारी पहाटे दोन अज्ञातांनी हवेत पाच राऊंड गोळीबार केली आणि तेथून पळ काढला. दोघांनी यावेळी हेल्मेट घातले होते यामुळे अद्याप त्यांची ओळख पटू शकली नाही. सलमानच्या घराबाहेर गोळ्यांच्या खुणा सापडल्या आहे. एक गोळी सलमानच्या बाल्कनीच्या जाळ्यातूनही गेली.
या बाल्कनीतून सलमान अनेकदा त्याच्या चाहत्यांना अभिवादन करतो. सध्या मुंबई पोलिसांकडून गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.