धक्कदायक! अभिनेता सलमानच्या घराबाहेर गोळीबार; 2 अज्ञातांकडून 4 राउंड फायर

धक्कदायक! अभिनेता सलमानच्या घराबाहेर गोळीबार; 2 अज्ञातांकडून 4 राउंड फायर

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या (Salman Khan) वांद्रे परिसरातील घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. या धक्कादायक घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार केला. या घटनेनंतर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींचा शोध मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) घेतला जात आहे.

Mumbai Police : अभिषेक घोसाळकर हत्येनंतर पोलीस अलर्ट; शस्त्र परवान्यांची होणार तपासणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान घरीच होता. सलमान खानला याआधीही धमक्या मिळाल्या होत्या. आता तर थेट त्याच्या घराबाहेरच गोळीबार झाल आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही अज्ञात आरोपींनी तीन ते चार राउंड फायर केल्या. त्यानंतर हे दोन्ही आरोपी येथून फरार झाले. या घटनेनंतर सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.

पोलीस सलमान खानकडूनही याबाबत अधिक माहिती घेत आहेत. तसेच खासगी सुरक्षारक्षकांचीही चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिक पथकही येथे दाखल झाले आहे. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. त्यांनी हवेत गोळीबार करून येथून पळ काढला. गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान घरातच होता. या हल्ल्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा व्यनस्था आणखी कडक केली आहे.

संजय राऊतांना धमकी देणाऱ्याचं लॉरेन्स बिष्णोई कनेक्शन? पोलिसांनी सांगितलं&#8230

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने याआधी अनेकदा सलमान खानला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमान खानचे वडील सलीम खान यांनाही दोन वर्षांपूर्वी धमकीची चिठ्ठी मिळाली होती. या आधीच्या घटना पाहता सलमान खान आणि कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. आता तर थेट घराबाहेरच गोळीबार झाला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज