Mumbai : सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरूस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकलने चिरडले
मुंबई : मुंबईमध्ये ( Mumbai) सिग्नल यंत्रणेमध्ये झालेला बिघाड दुरुस्तीचे काम करताना लोकल धडक दिल्याने तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा ( Train Employee) मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. वसई ते नायगाव या दरम्यान रेल्वे कर्मचारी सिग्नल यंत्रणेमध्ये झालेला बिघाड दुरुस्तीचे काम करत होते. त्यावेळी सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. (Mumbai local train runs over three railway employees fixing signalling issue)
Video : अयोध्येत भक्तांच्या गर्दीपुढे सुरक्षेचे तीन तेरा; अलोट गर्दी नियंत्रणासाठी नियमावली जारी
कामामध्ये व्यस्त असलेल्या या कर्मचाऱ्यांना रेल्वे आल्याचा आवाज आला. मात्र ती नेमकी कोणत्या रुळावरून येत आहे. त्याचा अंदाज न आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ झाला. त्याचवेळी भरधाव रेल्वेची धडक या तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना लागली. त्यामध्ये या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. हे तीनही रेल्वे कर्मचारी सिग्नल यंत्रणेमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी काम करत होते.
Budget 2024: सिंगल विंडोपासून ते कर सूटपर्यंत, ‘या’ आहेत रिअल इस्टेटची मागण्या
यामध्ये मुख्य सिग्नलिंग इन्स्पेक्टर वासू मित्र वय 56 वर्षे, सिग्नलिंग मेंटेनर सोमनाथ लाबूतरे वय 37 वर्षे आणि मदतनीस सचिन वानखेडे वय 37 वर्षे अशी या मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत. या दुर्घटनेनंतर वसई रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यामध्ये या तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याचे नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी दिली.
हे तीनही कर्मचारी पश्चिम रेल्वे मुंबई विभाग यामध्ये काम करत होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांसाठी पश्चिम रेल्वे प्राधिकरणाकडून 55 हजार रुपये प्रत्येकी नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.
मुंबईकरांसाठी BMC चं खास प्लॅनिंग; परराज्यातील वाहनांना मुंबईत ‘नो एन्ट्री’
मुंबई (Mumbai) वाहतूक कोंडी आणि त्यातून निर्माण होणारं प्रदूषण हे एक समीकरणच आहे. मात्र आता यामधून मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महानगरपालिकेने दुसऱ्या राज्यातून मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांना चेक नाक्यांवरच थांबवण्याचे योजना केली आहे. त्यामुळे आता परराज्यातून मुंबईत येणारे अवजड वाहनं हे दहीसर आणि मानखुर्द याचे चेक नाक्यांवरच थांबणार आहेत.
त्यासाठी या ठिकाणी पार्किंग आणि बस टर्मिनल बनवण्यात येतील. या प्रोजेक्टसाठी महानगरपालिकेला अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याबद्दल मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त कमिशनर अश्विनी जोशी यांनी माहिती दिली. लवकरच यासाठी टेंडर काढण्यात येणार आहे. तर या नाक्यांवर तब्बल 400 बस थांबण्याची व्यवस्था असेल.