Salman Khan Threat: सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

Salman Khan Threat: सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

Salman Khan Threat: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) गँगकडून धमकी देण्यात आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा धमकी दिल्याने भाईजानच्या सुरक्षेत वाढ करण्यात करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) भाईजानच्या सुरक्षेत पुन्हा वाढ केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


रविवारी बिश्नोईने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुक पोस्ट करणारा हा भारताबाहेरील आहे. पोस्ट शेअर करत असताना त्याने लिहिलं होतं की,”तुम्ही सलमान खान म्हणजेच भाईजानला तुमचा भाऊ मानता, परंतु आता वेळ आली आहे की तुमचा ‘भाऊ’ येऊन तुम्हाला वाचवेल. हा संदेश भाईजानसाठी आहे, दाऊद तुम्हाला वाचवणार अशा भ्रमात राहू नका.. तुम्हाला कोणी देखील यातून वाचवू शकणार नाही.

तसेच पुढे सांगितले आहे की, “सिद्धू मूसवालाच्या मृत्यूबद्दलच्या तुझ्या नाट्यमय पोस्टने कोणाचं लक्ष वेधून घेतले नाही. तो कसा होता आणि त्याचे गुन्हेगारी संबंध कसा होता, हे सर्वांना माहीत आहे. तुम्ही आता आमच्या टार्गेटवर आहात. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, लवकरच प्रदर्शित होईल. तुम्हाला पाहिजे असलेल्या कोणत्याही देशात पळून जा, परंतु लक्षात ठेवा, मृत्यूला हा निमंत्रण देण्याची गरज नसते.

भाईजान गेल्या काही दिवसांपासून गॅंगस्टार लॉरेन्स बिश्नोईने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याला एक धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. यात लिहिलेलं होतं की, प्रकरण मिटवा, समोरासमोर बोलायचं असेल तर सांगा. वेळीच कळवलं आहे. पुढच्या वेळी मोठा झटका बसणार, अशी तंबी दिली होती.

Sam Bahadur मध्ये हुबेहूब युद्धप्रसंग दाखवण्यासाठी रणगाडे, क्षेपणास्त्र डागणाऱ्या वाहनांचा वापर

यावर गिप्पी ग्रेवाल म्हणाला की,”माझी आणि भाईजानची मैत्री नाही. कोणाचा राग कोणावर काढला जात आहे. मौजानाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्या दरम्यान भाईजान खान भेटला होता. या सिनेमाच्या निर्मात्याने मला ट्रेलर लॉंचला निमंत्रण देण्यात आला होता. त्याअगोदर बिग बॉसच्या सेटवर तो भेटला होता. माझे कोणाशीही वैर नाही, त्यामुळे या प्रकरणात कोणाचा हात असू शकतो याची कल्पनाही करू शकत नाही.

गेल्या काही दिवसांपासून भाईजानचा ‘टायगर 3’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमाने मोठा गल्ला कमावला आहे. या सिनेमात सलमान खान आणि कतरिना कॅफ मुख्य भूमिकेत बघायला मिळत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube