Download App

संजय राऊत 100 दिवस जेलमध्ये राहिले, कैद्यांचीच.. बावनकुळेंचा खोचक टोला

मुंबई : राज्यातील कायदा सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचते असे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. त्यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार पलटवार केला आहे.

संजय राऊत जेलमध्ये शंभर दिवस राहिले, तेव्हापासून त्यांचा स्वभाव बदलला. ते आता कैद्यांसारखी भाषा बोलायला लागले आहेत, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.

याआधी संजय राऊत यांना सरकारच्या आनंदाच्या शिधा योजनेवर टीका केली होती. सध्या सामान्यांना आनंदाचा शिधा मिळत नाही तर तो आमदारांना खोक्यातून शिधा मिळतो, असे ते म्हणाले होते.

वाचा : बावनकुळे बोलून गेले, पण पोटात गोळा भानगिरेंच्या आला!

तसेच स्वत: च्या घरातील व्यक्तीसाठी एसआयटी स्थापन केली जाते. एका चुंबन प्रकरणाच्या व्हि़डीओवरुन चौकशी केली जाते. पण मी एका रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीचा फोटो ट्विट केला म्हणून एका खासदारावर, एका पत्रकारावर गुन्हा दाखल होतो ही या राज्याची कायदा व सुव्यवस्था कशी काही लोकांच्या कोठ्यावर नाचत आहे हे यावरुन स्पष्ट होते, असे राऊत म्हणाले होते.

Sanjay Maharashtra Politics : बावनकुळेंना कोणी अधिकार दिले?; जागावाटपाच्या वादात शिंदे गटाची उडी

हक्कभंग समितीला मी उत्तर देणार आहे. पण जे तक्रारदार आहेत त्यांनाच न्यायाधीश केले आहे. ज्यांच्यावर मी गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, ते राहुल कुल त्यांच्या या हक्कभंग समितीमध्ये समावेश आहे, असे राऊत म्हणाले. तसेच विधीमंडळाला चोरमंडळ मी कधीच म्हटलेले नाही. ज्यांनी खोके घेतले त्यांनी चोर म्हटलेले आहे, असे म्हणत राऊतांनी शिंदे गटाला टोला लगावला होता.

Tags

follow us