Maharashtra BJP : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (BJP) भारतीय जनता पार्टी मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रभारी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडली होती.
भारतीय जनता पक्षाने राज्यातील 36 जिल्यातील 58 नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या जाहीर केल्या आहे.अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे बदल देखील केले आहे. भाजपा कडून महानगरप्रमुख आणि जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी निष्ठावंतांनाच झुकते माप दिल्याचे यादीवरून दिसते.
नांदेडचा विचार केला तर अशोक चव्हाण यांच्या जवळचे म्हणून ओळखल्या असणाऱ्या माजी आमदार अमर राजूरकर यांची जिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे.त्यामुळे महापालिका निवडणुकीची सुत्रे आपल्याच हाती ठेवण्यात अशोक चव्हाण यांना यश आले आहे.तर परभणी महानगरप्रमुख पदी शिवाजी भरोसे यांची वर्णी लागली आहे.
जगतापांना भिडणारे शत्रुघ्न काटे पिंपरी-चिंचवडचे नवे शहराध्यक्ष; मनपा निवडणुकीत चमत्कार करणार?
जालना जिल्याचा विचार केला तर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा भाऊ भास्कर दानवे यांची जालना महानगरप्रमुख पदावर वर्णी लागल्यामुळे जालना जिल्ह्यावर आपली पकड कायम ठेवली.त्यासोबतच जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांची वर्णी चर्चेचा विषय ठरला आहे.आमदार असतांना जिल्हाध्यक्ष पद मिळाले याबबद्दल उत्सूकता आहे. नारायण कुचे हे रावसाहेब दानवे यांचेच समर्थक आहे त्यामुळे एकंदर जालना जिल्ह्यातील संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये रावसाहेब दानवे यांचा वरचष्मा पाहायला मिळतं असून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना साईड लाईन केलय का आशा देखील चर्चा रंगू लागल्या आहे.
मुंबई अध्यक्ष कोण
मुंबई भाजपा अध्यक्ष पदाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. माहिती सरकारच्या मंत्रिमंडळात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची वर्णी लागल्यानंतर मुंबई भाजपा अध्यक्ष कोण असतात यावर चर्चा सुरू होती. 36 जिल्ह्यांच्या 58 जिल्हाध्यक्ष आणि महानगरप्रमुखांच्या नावांची यादी जाहीर झाली मात्र मुंबई भाजपा अध्यक्ष चे नाव जाहीर करण्यात आलं नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई भाजपच्या अध्यक्षपदासाठी दावेदार असलेल्या प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम आणि संजय उपाध्याय यांच्या सह अनेक जण इच्छुक असल्यामुळे मुंबई भाजपा अध्यक्ष पदाच्या नावासाठी पक्षश्रेष्ठीकडून वेळ घेतल्या जात असल्याचे बोलले जात आहे.
आमदार प्रवीण दरेकर यांचं नाव सर्वात अग्रस्थानी असून त्यांच्या नावाला पक्षातील एक दोन जणांनी विरोध केला आहे. त्यामुळे मुंबई भाजपा अध्यक्षांचे नाव जाहीर होत नसल्याचेही बोलले जात आहे. मुंबई महापालिका सर्वात मोठी महापालिका असल्यामुळे महापालिकेवर आपली सत्ता राखण्यासाठी सर्वच पक्ष आपलं सर्वस्व पणाला लावणार आहे त्यामुळे मुंबई अध्यक्षपद आपल्याकडे यावं यासाठी भाजपामध्ये देखील अंतर्गत रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
मुबई प्रदेश तीन पदे तयार केली
मुंबई भाजपा अध्यक्ष पदावर वर्णी कोणाची लागेल हे लवकरच समजणार आहे. मुंबई, नाशिक येथील काही अध्यक्षांचे नावे केंद्रीय पक्षश्रेष्ठींकडे पाठवली असून त्यावर निर्णय झाल्यानंतर सदर नावे जाहीर केले जाणार आहे.मुंबई जिल्हाध्यक्ष पदासाठी 3 पदे तयारी केली आहे. उत्तर मुंबई- दीपक तावडे,उत्तर पूर्व मुंबई – दीपक दळवी आणि उत्तर मध्य -विरेंद्र म्हात्रे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
नागपुरात केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांच्या समर्थक साईड लाईन
भाजपच्या नागपूर जिल्हाअध्यक्षांची यादी जाहीर झाली असून शहराचे नवे अध्यक्ष पदी माजी महापौर दयाशंकर तिवारी यांची वर्णी लागली आहे तर नागपूर ग्रामीणचे दोन भाग करण्यात आले असून मनोहर कुंभारे नागपूर ग्रामीण काटोल तर अनंतराव राऊत नागपूर ग्रामीण रामटेक चे नवीन अध्यक्ष असणार आहे. नागपूर शहर अध्यक्षपद आपल्याकडे यासाठी नागपूर भाजपात रस्सीखेच होती.केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कट्टर समर्थक मानले जातात. आमदार प्रवीण दटके यांचे नाव अचानक या पदासाठी पुढे आले होते. दटके माजी महापौर आहेत. त्याही पेक्षा ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थकांना बाजूला सावरून
भाजपने सर्वांनाच धक्का देऊन नवीन अध्यक्ष जाहीर केले आहे.
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडे भाजपा संघटनात्मक 80 जिल्हा अध्यक्षांपैकी 58 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर झाली असून उरलेली 22 जिल्हाध्यक्षांची नावे लवकरच जाहीर होतील असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे . जिल्हाध्यक्ष पदाची निवडीची एक प्रक्रिया होती ती पूर्ण झाली आहे.भाजपा संघटनात्मक ८० जिल्हे आहेत, त्यातील ५८ जिल्हाध्यक्ष जाहीर झाले आहेत.प्रत्येक जिल्ह्यातून नावं प्रस्तावित केले होते त्यांना भाजपा राष्ट्रीय अध्यक्षांनी परवानगी दिली होती त्यानुसार 58 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर झाली आता उरलेले २२ जिल्हाध्यक्षांची देखील प्रक्रिया पूर्ण होईल.