BJP honors those who insult Maharashtra; Raut angry over Koshyari’s Padma Bhushan award : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. (Koshyari) सरकार दरवर्षी या पद्म पुरस्कारांची घोषणा करते. यावेळीदेखील अशाच काही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर जाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनादेखील पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदर संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान!
तसेच ते पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, कोश्यारी यांनी महाराष्ट्रात लोकशाही संविधानाची हत्या करून ठाकरे सरकार उखडून टाकले. राज्यपालांनी अनावश्यक कृत्य केल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. लोकशाही संविधान पायदळी त्यांनी तुडवले. संविधानाची हत्या केली, म्हणून त्यांना पद्मभूषण दिले असेल, तर त्याचा निषेध करतो. शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान केला होता; त्यांना मोदींचे सरकार सन्मानित करत आहे.
पुढे ते म्हणाले की, काल राष्ट्रपतींच्या भाषणात त्यांनी जगाला शांततेचा संदेश दिला आहे. पण देशात अशांतता, अस्थिरता आहे. अशांतता कुणामुळे आहे? शेजारील बांगलादेशात रोज हिंदूंच्या हत्या होत आहेत. काल दोघांना जाळले तिथं. अशावेळेला शांततेचा संदेश देवून हत्या थांबतील का, की इंदिरा गांधीप्रमाणे लष्करी कारवाई केल्यावर शांतता निर्माण होईल? केवळ शांततेचा संदेश देऊन उपयोग होणार नाही.
