Download App

चंद्रकांत पाटलांचे निवृत्तीविषयी मोठे विधान; म्हणाले, मी त्यानंतर…

Chandrakant Patil :  भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या निवृत्ती विषयी मोठे भाष्य केले आहे. चंद्रकांत पाटील हे पुण्याच्या सरहद संस्थेच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या कार्यक्रमाला हजेरी लावली. तिथे त्यांनी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. याचवेळी त्यांनी आपल्या निवृत्ती विषयी देखील मोठे विधान केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. तिची इच्छा होती की मी कोल्हापूरला यावं. मात्र तिला जेव्हा सरहद संस्थेच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलं, तेव्हा ती म्हणाली तू तिकडेच थांब. पुढे त्यांनी सांगितले की, “माझ्या बायकोची रिटायरमेंट झाल्यानंतर व माझी राजकीय रिटायरमेंट झाल्यानंतर, माझी राजकीय रिटायरमेंट कधी आहे हे माहीत नाही, पण त्यानंतर आम्ही सैनिकांसाठी काम करण्याचे ठरवले आहे.”

Ajit Pawar : माझा राजकारणातला वारसदार कोण? अजितदादांनी उत्तर सांगूनच टाकलं

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, सरहद संस्थेचा हा कार्यक्रम ह्रदयस्पर्शी आहे. या देशाला कुठल्याच दुश्मनाची भीती नाही. संजय नाहर यांचा रचनात्मक संघर्ष करत आहेत. प्रत्येकाची लढाई वेगळी असते. विद्यार्थी परिषदपासून नहार काम करत आहेत. आतंकवाद्यांकडून मारल्या गेलेल्या मुली आहेत. ज्यांना या लोकांनी त्रास दिला आहे. त्या मुलींना ते इकडे येऊन सरहद्द संस्थेत येतात. त्यांना इथं सुरक्षित राहण्यासाठी वातावारण तयार करतात.अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांच्या राहण्याच्या ठिकाणची सोय करण्यात आली, असं ते म्हणाले.

अजितदादांना कोणते काका जवळचे होते? शरद पवार सोडून इतरांशी कसे होते संबंध?

दरम्यान, चंद्रकांत पाटील हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत येत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण राहणार यावर चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांनी गेले अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून चंद्रकांत पाटील हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण आता उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्यातील असतील तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्री पद राहणार का, या कारणाने चंद्रकांतदादा हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

Tags

follow us