Download App

राष्ट्रवादीने कायम ओबीसींचा घात केला; बावनकुळेंचा घणाघात

Chandrashekhar Bawankule On NCP :  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रवादीने कायम ओबीसींचा घात केला आहे याची मी 50 उदाहरणे देऊ शकतो, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसांचे ओबीसी अधिवेशन नागपूर येथे पार पडले. त्यावरुन बावनकुळेंनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष ओबीसींचा क्रमांक एकचा शत्रू आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून विचार केला किंवा राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचा राजकीय प्रवास पाहिला तर कोणत्याही ओबीसीला एखाद्या सोडून मोठे करायचे काम यांनी केले नाही. छगन भुजबळ यांना देखील फार स्थान मिळाले नाही. नागपूरच्या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्षपद किंवा राज्यातील अध्यक्षपद ओबीसीला देतील असे वाटले होते पण तसे झाले नाही.

एक पोलीस अधिकारी तोडणार भाजप-शिवसेना युती? शिंदेंचे काम न करण्याचा ठराव मंजूर

राष्ट्रवादीने कायम ओबीसीचा घात केला, याची 50 उदाहरणे मी देऊ शकतो. नागपूरचा अधिवेशन हा फक्त दिखावा होता. मा. पंतप्रधान पदापर्यंत भाजपने ओबीसी नेतृत्वाला संधी दिली, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपने जाहीर केलेल्या निवडणूक प्रमुखांविषयीदेखील भाष्य केले.

मोठी बातमी! ‘तुमचाही दाभोलकर होणार’; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

भाजपने राज्यातील लोकसभा व विधानसभेच्या जागांवर आपले निवडणूक प्रमुख नेमले आहे. ज्याठिकाणी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत, त्याठिकाणी आम्ही पूर्ण ताकद लावून उमेदवाराला निवडून आणू, असे बावनकुळेंनी सांगितले. यावेळी त्यांनी शरद पवारांना आलेल्या धमकीवर देखील भाष्य केले. ज्याने धमकी दिली त्याचा बायोमध्ये भाजपचा कार्यकर्ता असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावर बावनुळे म्हणाले की, तो भाजपचा, शिवसेनेचा राष्ट्रवादीचा कोणत्याही पक्षाचा असो धमकी देणे हे आमच्या रक्तामध्ये नाही. धमकी देणाऱ्याला अटक झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

Tags

follow us