मुंबई : आगामीकाळात राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. अद्याप निवडणुकांच्या तारखा जरी जाहीर झालेल्या नसल्या तरी राजकीय पक्षांकडून विधानसभेचं मैदान मारण्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींमध्ये अनेक राजकीय नेते पक्षांतर करत असून, शरद पवारांनी (Sharad Pawar) विधानसभेचं बिगुल वाजण्यापूर्वीचं वारं फिरवत अमित शाहंच्या (Amit Shah) गोटातील खास व्यक्तीच्या हाती तुतारी दिली आहे.
Video : असुरांचा संहार कराया मशाल हाती दे; अराजकीय गाण्यासह ठाकरे विधानसभेच्या मैदानात
हाती तुतारी घेणारा नेता कोण?
आता ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला धक्का देत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारी ही राजकीय व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून, भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत. हर्षवधर्न पाटील (Harshawardhan Patil) यांनी आज (दि.3) शरद पवारांची मुंबईत सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. उद्या (दि.4) सकाळी पत्रकार परषिदेत अंतिम निर्णयाची घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पवारांनी फोडला सहकार खात्याचा खास माणूस
ऐन निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडत पवारांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. हर्षवर्धन पाटील यांची नुकतीच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे अमित शाहंच्या खात्याचा खास माणून पवारांनी फोडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
संभाजी भिडे पुन्हा बरळले; 76 राष्ट्रांनी आक्रमण केलेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान
लेकीच्या स्टेटसनं केलं शिक्कामोर्तब
दुसरीकडे हर्शवर्धन पाटील यांची कन्या अंकिता यांनी व्हॉट्सअप स्टेटसवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह ठेवल्याने आता हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे.
दत्ता भरणेंनी सुरू केला प्रचार
महायुतीमधील नियमाप्रमाणे विद्यमान आमदाराची जागा त्या त्या पक्षाला सुटणार आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी निवडणुकांसाठीच्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे, हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता मावळली असून त्यांनी तुतारी हाती घेण्याचं निश्चित केल्याचे बोलले जात आहे.
…अन् दिवट्या आमदार पोलीस स्टेशनला, पवारांनी सुनील टिंगरे यांना धुतले
एक पक्षात राहण्याचे समाधान वेगळं असतं
शरद पवारांच्या भेटीनंतर आता हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झालं असून, या प्रवेशावर भाजपची प्रतिक्रिया समोर आली आहे. हर्षवर्धन पाटलांचं चुकीचं सुरू आहे असं मी म्हणणार नाही. राजकारणात महत्वकांक्षा असतात, पण एक पक्षात राहण्याचे समाधान वेगळं असतं असे म्हणत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एकप्रकारे हर्षवर्धन पाटील भाजपला रामराम करणार असल्याचे संकेत दिले आहेत.