Download App

“ठाकरे-फडणवीसांची लिफ्टमधील भेट म्हणजे..” भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

राजकारणात अशा घटना नेहमीच घडत असतात. कदाचित दोघं एकाचवेळी आल्यामुळे लिफ्टमध्ये त्यांची भेट झाली असावी.

Image Credit: letsupp

Uddhav Thackeray Devendra Fadnavis : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू झालं. या अधिवेशनाचा पहिलाच दिवस राज्याच्या राजकारणात चर्चेचा ठरला. पहिल्या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची लिफ्टमध्ये भेट झाली. दोन्ही नेत्यांत चर्चाही झाली. दोन्ही मोठ्या नेत्यांची ही भेट म्हटल्यानंतर चर्चा तर होणारच. उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) मात्र ही भेट निव्वळ योगायोग होता असे सांगून टाकले. मात्र, भाजप नेत्यांकडून या भेटीचे वेगळेच अर्थ काढले जात आहेत. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र येणार का अशीही चर्चा सुरू झाली आहे. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी खळबळ उडवून देणारं वक्तव्य केलं आहे.

पाटील म्हणाले, राजकारणात अशा घटना नेहमीच घडत असतात. कदाचित दोघं एकाचवेळी आल्यामुळे लिफ्टमध्ये त्यांची भेट झाली असावी. सभागृहातही सर्वांची भेट होत असते. राजकारणात तर कुणी कुणाचा कायमचा मित्र आणि शत्रूही नसतो. काल लोकसभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या (Rahul gandhi) दोघांनी लोकसभा अध्यक्षांना खुर्चीवर बसवलं. लोकशाहीतील हे काही संकेत असतात. त्यादृष्टीने त्याकडे पाहिलं पाहिजे असे हर्षवर्धन पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

ती लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, फडणवीसांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

आगामी विधानसभा निवडणूक महायुती एकत्रित लढणार आहे. याबाबत पुढील चर्चा अजून झालेली नाही. इंदापूर जागेबाबत देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असेही हर्षवर्धन पाटील यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले.

CM शिंदेंचाही ठाकरेंना खोचक टोला

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. या दोन्ही नेत्यांच्या संयुक्त भेटीवर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ती लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांनी लिफ्ट शिप्ट केली. आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये गेलो. ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेले, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला होता.

follow us

वेब स्टोरीज