ती लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, फडणवीसांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

ती लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, फडणवीसांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. या दोन्ही नेत्यांच्या संयुक्त भेटीवर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ती लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

Ajit Pawar : अजित पवारांनी सांगितला सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा अन् … 

मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सायकांळी माध्यमांशी संवाद साधा. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीविषयी विचारले असता शिंदे म्हणाले, त्यांची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत जाऊ शकत नाही. त्यांनी लिफ्ट शिप्ट केली. आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये गेलो. ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेले, असा टोला लगावला.

खोके सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असल्याची टीका ठाकरेंनी केली होती. त्यावरही शिंदेंनी भाष्य केलं. हे अधिवेशन निरोपाचे नाही तर निर्धाराचे आहे. निरोप कोण कोणाला देईल, हे जनता ठरवेल, असं शिंदे म्हणाले.

रुपेरी पडद्यावर इतिहासातलं सुवर्णपान उलगडणार; आकर्षक मोशन पोस्टरने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष 

नडीए सरकारवर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काही लोक बोलत आहेत. काही लोक जल्लोष करत आहेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यामुळं पेढे वाटत आहेत. भाजपने 240 जागा जिंकल्या. त्यांच्या सर्वाच्या मिळून तितक्या जागा आल्या नाही. विरोधकांनी खोटं नॅरेटीव्ह पसरलं, तरीही मोदी सत्तेत आले, असं शिंदे म्हणाले.

लाडके भाऊ कुठे आहेत?
उद्धव ठाकरेंच्या लाडका भाऊ, या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही लेक लाडकी ही योजना आणलीच आहे, तशी लाडकी बहीण योजनाही आणू… पण, असं म्हणणाऱ्यांचे लाडके भाऊ कुठे आहेत? असं म्हणणाऱ्यांनी विचार करावा, आत्मपरीक्षण करावं.. आम्ही सगळ्या भावांचा आणि बहिणींचा विचार करणा आहोत, तुम्हाला कळेलच, असं शिंदे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज