नेमके कोणते शरद पवार खरे ? ; ‘त्या’ वक्तव्यावर भाजप प्रवक्ते उपाध्येंनी विचारला प्रश्न

पुणे – पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने (BJP) जोरदार टीका केली आहे. पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी पत्रकार परिषद […]

Devendra Fadanvis Sharad Pawar

Devendra Fadanvis Sharad Pawar

पुणे – पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने (BJP) जोरदार टीका केली आहे. पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे.

हे वाचा : Sharad Pawar यांनी गुगली टाकताच भाजपवाले शरद पवारांवर तुटून पडले

ते म्हणाले, की मागे एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते,की शरद पवारांना हे सर्व माहिती होते. पण, पवार म्हणाले होते, की मला याबाबत माहिती नाही. आता मात्र तेच पवार पहाटेच्या शपथविधीबाबत असे म्हणत आहेत मग नक्की कोणते पवार खरे आहेत ?, असा सवाल त्यांनी केला. पवार हे विश्वासार्हतेसाठी कधीच प्रसिद्ध नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला.

BJP Spokesperson : भाजप प्रवक्त्यांची यादी जाहीर, राम शिंदेंना मिळाली मोठी जबाबदारी

ते पुढे म्हणाले, की पवार हे विश्वासार्हतेसाठी ओळखले जात नाहीत. तेच पवार आता कसब्यात (Kasba Bypoll) प्रचारासाठी येत आहेत. याचा अर्थ काँग्रेसचा (Congress) पराभव नक्की आहे. म्हणून राष्ट्रीय नेते शरद पवार प्रचारासाठी पुण्यात आले आहेत अशी टीका त्यांनी केली. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रचारासाठी आता दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचे प्रचार दौरे सुरू आहेत. खुद्द  शरद पवार हे देखील प्रचारात उतरले आहेत. त्यातच त्यांनी पहाटेच्या शपथविधीवरून केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

Exit mobile version