Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. 1992 साली बाळासाहेबांनी जो राजीनामा दिला तो राऊतांसारख्याच लोकांमुळे दिले होता. यानंतर बााळासाहेब कर्जत फार्महाऊसला निघून गेले होते.त्यामुळे मी म्हणतोय संजय राऊत सारखा माणून घरात घेण्याच्या लायकीचा नाही, असे ते म्हणाले आहेत.
पवार कुटूंबातल्या विषयावर कोणीही राजकारणी भाष्य करत नव्हता. त्यावेळी राऊतांनी भाष्य करुन अजितदादांचा अपमान केला. यांना कोणी अधिकार दिला. हा कायम आग लावायला पुढे जातोस, तोंड काळ करायला कशाला जातोस, आधुनिक शकुनी मामा आहेस का तू, असे म्हणत त्यांनी राऊतांचा एकेरी उल्लेख केला आहे.
संजय राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेगिरी करू नये; नाना पटोलेंचा हल्लाबोल
तसचे मुंबईच्या वज्रमूठ सभेमध्ये पोडिअमवरुन वाद झाला. त्यावेळी अजितदादांना आधी मुख्य पोडिअम देण्यात आले नाही. अजितदादांन मुख्य पोडिअम न देणं हा निर्णय पण संजय राऊतांनीच घेतला होता. अजितदादांना अपमानित करण्याच हा प्रयत्न होता. त्याचे घाणेरडे कार्यक्रम स्टेजवरदेखील चालू होते, असे म्हणत त्यांनी राऊतांना सुनावले आहे.
Ajit Pawar यांच्या राक्षसी स्वप्नापायी शिवसेना फुटली, रामदास कदमांचा गंभीर आरोप
अजितदादांची देखील साध्या पोडिअमवर भाषण करण्याची तयारी होती. पण अजितदादांना विशेष पोडिअमविषयी कळल्यावर त्यांनी ते बदलायला लावले, असे राणे म्हणाले आहेत. राऊत हे घरात आल्यानंतर त्यामध्ये आग कशी लावायची असा त्यांचा कार्यक्रम चालू आहे. तसेच राऊत हे मुद्दामहून मोहित कंबोज यांना डिवचत आहेत. तेजस ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या गोष्टी बाहेर यावात, हे राऊतांना हवे आहे, असे ते म्हणाले आहेत.